IPL 2022 | धोनी की रोहित, कमाईच्या बाबतीत किंग कोण? तुम्हीच बघा
आयपीएलमुळे (IPL) अनेक खेळाडू मालामाल झालेत. आयपीएलमुळे जशी युवा खेळाडूंना संधी मिळते, तसेच पैसाही मिळतो. या मोसमातील 10 कर्णधार भरभरुन कमावणार आहेत.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2022) 15 व्या हंगामाला 26 मार्चपासून सुरूवात होत आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील या मोसमातील पहिला सामना 26 मार्चला खेळवण्यात येणार आहे. आयपीएलमध्ये यंदा दहा संघांमध्ये लढत होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व गाजवणाऱ्या बड्या खेळाडूंच्या हाती नेतृत्वाची धुरा देण्यात आलेली आहे. (ipl 2022 ipl captains rohit sharma mahendra singh dhoni virat kohli know all skipers net worth)
आयपीएलमुळे अनेक खेळाडू मालामाल झालेत. आयपीएलमुळे जशी युवा खेळाडूंना संधी मिळते, तसेच पैसाही मिळतो. या मोसमातील 10 कर्णधार भरभरुन कमावणार आहेत, तसेत त्यांचं नेटवर्थही शानदार आहे. कोणत्या कॅप्टनची किती कमाई आहे, हे आपण जाणून घेऊयात.
1. मयंक अग्रवाल : पंजाब किंग्जने 12 कोटी रुपये मोजून मयंक अग्रवालला रिटेन केलं. मयंकची एकूण संपत्ती 26 कोटींच्या जवळपास आहे. मयंक बीसीसीआयच्या वार्षिक कराराचा भागही आहे.
2. ऋषभ पंत : दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंतला या आयपीएलच्या मोसमातून 16 कोटी रुपये मिळत आहेत. रिपोर्ट्सनुसार पंतची एकूण नेट वर्थ 36 कोटी इतकी आहे.
3. हार्दिक पंड्या : आयपीएलमध्ये नव्याने आलेल्या गुजरात टायटन्स टीमची धुरा हार्दिक पंड्याला देण्यात आली आहे. हार्दिकची नेट वर्थ 37 कोटी इतकी आहे.
4. संजू सॅमसन : राजस्थान रॉयल्सच्या टीमची जबाबदारी ही संजू सॅमसनकडे आहे. संजू सॅमसनला या आयपीएलमध्ये 14 कोटी रुपये मिळत आहेत. संजूची नेट वर्थ 52 कोटी इतकी आहे.
5. श्रेयस अय्यर : कोलकाताने यावेळेस श्रेयस अय्यरला कर्णधारपदाची सूत्र सोपावली आहेत. मुंबईकर श्रेयसची नेट वर्थ ही 53 कोटी इतकी आहे.
6. केन विलियमनसन : केन सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन आहे. केनला या मोसमासाठी 14 कोटी मिळाले आहेत. रिपोर्ट्सनुसार नेट वर्थ 58 कोटी इतकी आहे.
7. केएल राहुल : केएलला पंजाबनंतर आता लखनऊ या नव्या संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. बीसीसीआयच्या वार्षिक कंत्राटानुसार त्याला 5 कोटी रुपये मिळतात. तसेच तो अनेक जाहिराती करतो. या सर्व माध्यमातून होणाऱ्या कमाईचा आकडा हा जवळपास 75 कोटी इतका आहे.
8. फॅफ डु प्लेसिस : आरसीबीची कॅप्टन्सी आता विराटनंतर फॅफ डु प्लेसिस करणार आहे. फॅफला आरसीबीकडून 7 तर आफ्रिका बोर्डाकडून 3 कोटी मिळतात. त्याची वार्षिक कमाई ही 102 कोटी रुपये इतकी आहे.
9. रोहित शर्मा : रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. तो सध्या टीम इंडियाचाही कॅप्टन आहे. रोहित हा बीसीसीआयच्या ए प्लस वर्गवारीतील खेळाडू आहे. त्यामुळे रोहितला बीसीसीआयकडून वार्षिक 7 कोटी रुपये मिळतात. तर मुंबईकडून या मोसमासाठी 16 कोटी रुपये देण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार, रोहितची एकूण कमाई ही 180 कोटी इतकी आहे.
10. महेंद्रसिंह धोनी : धोनीकडे चेन्नई सुपर किंग्सच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. धोनी यशस्वी कर्णधार आहे. या 15 व्या मोसमासाठी 12 कोटी रुपये मिळणार आहेत. धोनी जाहिरातीही करतो. रिपोर्टनुसार धोनीची कमाई ही 800 कोटी रुपये इतकी आहे.