पुणे : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले आहे. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 161 धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. (ipl 2022 kkr vs mi mumbai indians set 162 runs target for winning kolkata knight riders)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिलक वर्माने नाबाद 38 धावा केल्या. तर डेवाल्ड ब्रेविसने 29 धावांचं योगदान दिलं. तसेच अखेरच्या चेंडूमध्ये कायरन पोलार्डने 22 धावांची वादळी खेळी केली. कोलकाताकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर वरुण चक्रवर्थी आणि उमेश यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली. 


मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, डेनियल सॅम्स , डेवाल्ड ब्रेविस, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टिमाल मिल्स आणि बासिल थम्पी. 


केकेआर प्लेइंग इलेव्हन :  श्रेयस अय्यर (कर्णधार), वेंकटेश अय्यर,  अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, पॅट कमिन्स, उमेश यादव, रसिख सलाम आणि वरुण चक्रवर्ती.