मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 8 वा सामना (IPL 2022) आज (1 एप्रिल) पार पडणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचे आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर करण्यात आलंय. कोलकाताने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. (ipl 2022 kkr vs pbks kolkata knight riders win toss and elect to field first)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाताचा यंदाच्या मोसमातील हा तिसरा सामना आहे. कोलकाताला या आधीच्या 2 सामन्यांमध्ये एकदा विजयाचा आणि एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पंजाबने या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे.  त्यामुळे या सामन्यात कोणती टीम वरचढ ठरणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.


पंजाबकडून कगिसो रबाडाचं पदार्पण


पजांबकडून एक अनुभवी गोलंदाजाने कोलकाता विरुद्धच्या या सामन्यातून पदार्पण केलंय. रबाडाच्या एन्ट्रीमुळे पंजाबच्या बॉलिंगला आणखी धार प्राप्त होणार आहे. 


तर दुसऱ्या बाजूला कोलकातामध्ये एकमेव बदल करण्यात आला आहे. शेल्डन जॅक्सनला वगळून त्याच्या जागी शिवम मावीला संधी देण्यात आली आहे.


केकेआर प्लेइंग इलेव्हन | श्रेयस अय्यर (कॅप्टन), अजिंक्य रहाणे,  वेंकटेश अय्यर, नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नारायण, टीम साऊथी, उमेश यादव, शिवम मावी आणि वरुण चक्रवर्ती. 


पंजाबची प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, लियाम लिविंगस्टन, भानुका राजपक्षे (विकेटकीपर), शाहरुख खान, ओडियन स्मिथ, राज बावा, अर्शदीप सिंह, हरप्रीत बराड, कगिसो रबाडा आणि राहुल चाहर.