IPL 2022, LSG VS DC | दिल्लीकडून लखनऊला विजयासाठी 150 धावांचं आव्हान
दिल्ली कॅपिट्ल्सने (delhi capitals) लखनऊ सुपर जायंट्सला (lucknow super giants) विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले आहे.
नवी मुंबई : दिल्ली कॅपिट्ल्सने (delhi capitals) लखनऊ सुपर जायंट्सला (lucknow super giants) विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले आहे. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 149 धावा केल्या. दिल्लीकडून ओपनर बॅट्समन पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. तर कॅप्टन रिषभ पंतने (Rishabh Pant) नाबाद 39 आणि सरफराज खानने (Sarfaraj Khan) नॉट आऊट 36 रन्स केल्या. लखनऊकडून रवी बिश्नोईने 2 तर कृष्णप्पा गौतमने 1 विकेट घेतली. (ipl 2022 lsg vs dc delhi capitals set 150 runs winning target for lucknow super giants at d y patil stadium)
दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन), पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, सरफराज खान, रोवमैन पावेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया आणि मुस्तफिजुर रहमान.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डिकॉक, एविन लुइस, कृष्णप्पा गौतम, दीपक हुड्डा, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, जेसन होल्डर, एंड्रू टाय, रवि बिश्नोई आणि आवेश खान.