मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आतापर्यंत अनेक फलंदाजांनी धमाकेदार कामगिरी केलीय. मात्र यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) आयुष बदोनी (Ayush Badoni) हा चमकला. युवा बदोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळलेल्या सामन्यात आपली छाप सोडली. (ipl 2022 lsg vs dc lucknow super giants young bastman ayush badoni hit winning six against delhi capitals)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी 7 एप्रिलला लखनऊ विरुद्ध दिल्ली यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात बदोनीने दिल्ली विरुद्ध 3 बॉलममध्ये 10 धावा करत आपल्या टीमला विजय मिळवून दिला. 


लखनऊचा हा या मोसमातील 4 सामन्यांमधील तिसरा विजय ठरला. लखनऊच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे. बदोनी टीमसाठी फिनिशरची भूमिका पार पाडतोय. बदोनी महेंद्रसिंह धोनीप्रमाणे टीमला विजय मिळवून देत आहे. 


बदोनीने लखनऊकडून 4 डावांमध्ये 102 धावा केल्या आहेत. बदोनीने चेन्नई विरुद्ध 9 बॉलमध्ये 19 धावा केल्या, यामध्ये 2 सिक्स लगावले. विशेष म्हणजे बदोनीने आपल्या आयपीएलच्या पदार्पणातील सामन्यात अर्धशतकी खेळी केली. बदोनीने या सामन्यात 41 बॉलमध्ये 54 रन्सची खेळी केली. बदोनीच्या या कामगिरीमुळे त्याच्याकडे टीम इंडियाचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे.


टीम इंडियामध्ये एन्ट्री मिळणार? 


आगामी टी 20 वर्ल्ड कप 2022 चं आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आलं आहे. बदोनीची आयपीएलमधल कामगिरी पाहता निवड समिती त्याला टीम इंडियामध्ये संधी देऊ शकते.


धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडिया आतापर्यंत बेस्ट फिनीशरच्या शोधात आहे. टीम इंडियाच्या बेस्ट फिनीशरच्या शोधाला बदोनी पूर्णविराम देऊ शकतो. 


बदोनी अवघ्या 22 वर्षांचा आहे. बदोनीला टीम इंडियामध्ये संधी मिळाली, तर रोहित शर्माच्या नेतृत्वात त्याची कारकिर्द बहरु शकते. लखनऊने बदोनीला 20 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होतं.