पुणे :  आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आज (2 एप्रिल) डबल हेडर सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय. या डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujrat titans) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals)  आमनेसामने असणार आहेत.  या सामन्याचं आयोजन हे पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमध्ये करण्यात आलंय. दिल्लीने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. (ipl 2022 match 10 gt vs dc delhi capitals win toss elect to field against gujrat titans at pune)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पंड्या (कॅप्टन), शुबमन गिल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), विजय शंकर, डेव्हिड मिलर,  राहुल तेवतिया, अभिनव मनोहर,  राशिद खान, लॉकी फर्ग्यूसन,  मोहम्मद शमी आणि वरुण एरॉन


दिल्ली कॅपिट्ल्स प्लेइंग इलेव्हन : रिषभ पंत (विकेटकीपर-कॅप्टन), पृथ्वी शॉ, टीम सायफर्ट, सरफराज खान, ललित यादव, रोवमॅन पॉवेल, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद आणि मुस्तफिजुर रहमान.