IPL 2022, PBKS vs RCB | कॅप्टन होताच फॅफचा तडाखा, पंजाबला विजयासाठी 206 धावांचे तगडं आव्हान
आरसीबीने (RCB) पंजाब किंग्सला (PBKS) विजयासाठी 206 धावांचं मजबूत आव्हान दिलंय. बंगळुरुने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 205 धावा चोपल्या.
मुंबई : आरसीबीने (RCB) पंजाब किंग्सला (PBKS) विजयासाठी 206 धावांचं मजबूत आव्हान दिलंय. बंगळुरुने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 205 धावा चोपल्या. आरबीसीकडून कॅप्टन फॅफ डु प्लेसिसने (Faf Du Plesis) सर्वाधिक 88 धावांची खेळी केली. अनुज रावतने 21 धावा केल्या. तर शेवटी विराट कोहली (Virat Kohli) आणि दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) जोरदार फटकेबाजी करत आरसीबीली 200 पार पोहचवलं. (ipl 2022 match 3 pbks vs rcb set 206 runs target for winning to punjab at d y patil stadium navi mumbai)
विराटने नाबाद 41 तर दिनेश कार्तिकने नॉट आऊट 32 रन्स केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि राहुल चाहरने प्रत्येकी 1 विकेट घेतला. दरम्यान आता पंजाबचे फलंदाज हे विजयी आव्हान पेलणार की बंगळुरुचे गोलंदाज त्यांना रोखणार, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन : फॅफ डुप्लेसीस (कॅप्टन), अनुज रावत, विराट कोहली, शेरफेन रुदरफोर्ड, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), डेविड विली, शाहबाज अहमद, वानिंदु हसारंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.
पंजाब इलेव्हन : मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, लियम लिविंगस्टन, भानुका राजपक्षा (विकेटकीपर), ओडीन स्मिथ, शाहरुख खान, राजअंगद बावा, अर्शदीप सिंह, हरप्रीत बराड, संदीप शर्मा आणि राहुल चाहर.