बंगळूरू : इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या सिझनच्या मेगा लिलावाचा आज दुसरा दिवस आहे. शनिवारी पहिल्या दिवशी झालेल्या लिलावात अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लावण्यात आली. आवेश खान आणि दीपक चहर यांनी कोटींची बोली लागली. लखनऊच्या टीमने आवेश खानला 10 कोटी आणि दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्जने 14 कोटींमध्ये खरेदी केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता दुसऱ्या दिवशी इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, जोफ्रा आर्चर आणि मार्टिन गप्टिल असे अनेक स्टार खेळाडू पाहायला मिळणार आहेत. सर्व 10 टीम या खेळाडूंवर मोठी बोली लावू शकतात. दुसऱ्या दिवशी आर्चर, अॅरॉन फिंच आणि ओडिन स्मिथ हे सर्वात जास्त पाहायला मिळणार आहेत.


दुसऱ्या दिवशी या खेळाडूंवर असणार नजर


भारतीय खेळाडू


ईशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, एस श्रीसंत, पीयूष चावला, जयंत यादव, जयदेव उनादकट, चेतेश्वर पुजारा, शिवम दुबे, विजय शंकर, हनुमा विहारी, मुरली विजय, यश धुल और अर्जुन तेंडूलकर. 


विदेशी खेळाडू


जोफ्रा आर्चर, डेविड मलान, साकिब महमूद, एरॉन फिंच, ओएन मोर्गन, जिमी नीशम, टिम साउदी, कॉलिम मुनरो, मार्नस लाबुशेन, लियाम लिवंगस्टोन, ओडीन स्मिथ, डेवॉन कॉन्वे, मार्टिन गुप्टिल, फेबियन एलेन, लुंगी एनगिडी. 


पहिल्या दिवशी 23 खेळाडूंना मिळाला नाही खरेदीदार


पहिल्या दिवशी एकूण 97 खेळाडूंनी बाजी मारली. यामध्ये सर्व 10 टीम्सने मिळून 20 परदेशी खेळाडूंसह 74 खेळाडूंना खरेदी केलं. 23 खेळाडू असे होते ज्यांना एकही खरेदीदार मिळाला नाही. पहिल्या दिवशी सर्व संघांनी एकूण 388 कोटी 10 लाख रुपये खर्च केले.


टीमच्या पर्समध्ये उरलेले पैसे


  • पंजाब किंग्स           उर्वरित पैसे 28 कोटी, 65 लाख रु.  

  • मुंबई इंडियंस          उर्वरित पैसे 27 कोटी, 85 लाख रु.

  • चेन्नई सुपर किंग्स     उर्वरित पैसे 20 कोटी, 45 लाख रु.

  • हैदराबाद टीम         उर्वरित पैसे 20 कोटी, 15 लाख रु.

  • गुजरात टाइटंस        उर्वरित पैसे 18 कोटी, 85 लाख रु.

  • दिल्ली कॅपिटल्स       उर्वरित पैसे 16 कोटी, 50 लाख रु.

  • कोलकाता टीम        उर्वरित पैसे 12 कोटी, 65 लाख रु.

  • राजस्थान रॉयल्स      उर्वरित पैसे 12 कोटी, 15 लाख रु.

  • बंगलुरु टीम          उर्वरित पैसे 9 कोटी, 25 लाख रु.

  • लखनऊ टीम         उर्वरित पैसे 6 कोटी, 90 लाख रु.