IPL 2022 : मुंबई-चेन्नई पाठोपाठ आणखी एक टीम प्लेऑफमधून बाहेर?
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का, मुंबई-चेन्नई पाठोपाठ कोणाचा नंबर लागला पाहा
मुंबई : आयपीएलचे सामने हळूहळू प्लेऑफच्या दिशेन जात आहे. जसं प्लेऑफ जवळ येतय तसे सामने अधिक रंजक आणि अटीतटीचे होताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटप्रेमींसाठी निराशाजनक बातमी आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई पाठोपाठ आता आणखी एक टीम प्लेऑफमधून बाहेर पडली आहे.
दिल्ली विरुद्धचा सामना गमवल्यानंतर आता कोलकाता टीम देखील प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडण्याच्या दिशेन वाटचाल करत आहे. कोलकाता टीमने सुरुवातीचे सामने खूप चांगल्या पद्धतीने जिंकले मात्र आता कोलकाताला पराभवाचा सामना करावा लागत आहे.
5 वेळा चॅम्पियन झालेली मुंबई टीम प्लेऑफमधून बाहेर गेली. त्यापाठोपाठ चेन्नई टीम 4 वेळा ट्रॉफी जिंकली पण प्लेऑफमधून बाहेर गेली. आता कोलकाता टीम या स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबईने 8 सामने गमवाले आहेत. तर चेन्नईने 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. कोलकाता टीमने 9 पैकी 3 सामने जिंकले तर 6 सामने गमवले आहेत. त्यामुळे कोलकाता टीम सध्या धोक्यात आहे. केव्हाही प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर होऊ शकते.
पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. गुजरात टीम पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, तिसऱ्यावर हैदराबाद, लखनऊ, बंगळुरू यांच्यात सध्या चुरशीची लढत दिसत आहे.