मुंबई :  मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलच्या (IPL 2022) इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात मुंबईने 5 वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. मात्र एका दिग्गज खेळाडूने मुंबई इंडियन्सवर गंभीर आरोप केले आहेत. या खेळाडूने मुंबई टीममध्ये खेळाडूंची निवड कशी केली जाते, याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. तसेच प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा कसा सामना करावा लागतो याबाबतही या खेळाडूने सांगितलं आहे. (ipl 2022 mi mumbai indians team manegment built pressure on robin uthappa) 


कोण आहे हा खेळाडू? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) मुंबई संघावर जाहीरपणे गंभीर आरोप केले आहेत. मुंबई टीममध्ये असतानाही आरसीबीमध्ये पाठवण्यात आल्याचा गौप्यस्फोट उथप्पाने केला. माझ्यावर दबाव बनवून मला धमकावून ट्रान्सफर पेपरवर सही घेतल्याचं उथप्पा म्हणाला. उथप्पाने रवीचंद्रन अश्विनसोबत युट्युबवर एका शो दरम्यान हा गौप्यस्फोट केला.  उथप्पा आयपीएलच्या दुसऱ्या मोसमात (IPL 2008) मुंबई टीमचा सदस्य होता. 


उथप्पा काय म्हणाला? 


माझी ट्रान्सफर पेपरवर सही करण्याची इच्छा नव्हती. मात्र सही न केल्यास मला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार नाही, असं मुंबई टीमच्या एका सदस्याने मला सांगितलं. 


"मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात तणावातून जात होतो. RCB सोबतच्या माझ्या पहिल्या सत्रात मी पूर्ण नैराश्यात होतो. आरसीबीकडून खेळताना मला त्या मोसमातील एकाही सामन्यात चांगली बॅटिंग करता आली नाही", असं उथप्पा म्हणाला.