MI vs LSG | मुंबईचा सलग सहावा पराभव, लखनऊचा 18 धावांनी विजय
शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रंगतदार आणि तितक्याच थरारक सामन्यात लखनऊने (Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) विजय मिळवला आहे.
मुंबई : शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रंगतदार आणि तितक्याच थरारक सामन्यात लखनऊने (Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) विजय मिळवला आहे. यासह मुंबई इंडियन्सचा या मोसमातील हा सलग सहावा पराभव ठरला आहे. लखनऊने मुंबईवर 18 धावांनी मात केली आहे. (ipl 2022 mi vs lsg lucknow beat mumbai by 18 runs mumbai indians consecutive 6 match losses)
लखनऊने मुंबईला विजयासाठी 200 धावांचे आव्हान दिले होते. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 181 धावांपर्यंतच मजल मारता आली.
मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 37 धावांची खेळी केली. डेवाल्ड ब्रेविसने 31 धावा जोडल्या. टिळक वर्माने 26 धावांचं योगदान दिलं. कायरन पोलार्डने 25 रन्स केल्या. तर कॅप्टन रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामी जोडीने निराशा केली.
लखनऊची बॅटिंग
त्याआधी मुंबईने टॉस जिंकून लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कॅप्टन केएल राहुलने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर लखनऊने मुंबईला विजयासाठी 200 धावांचे मजबूत आव्हान दिले. लखनऊने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 199 धावा केल्या.
लखनऊकडून कॅप्टन केएलने 60 बॉलमध्ये 9 फोर आणि 5 सिक्ससह सर्वाधिक नाबाद 103 धावांची खेळी केली. तर मनीष पांडेने 38 आणि क्विंटन डी कॉकने 24 धावांचं योगदान दिलं.
मुंबईकडून जयदेव उनाडकटने 2 विकेट्स घेतल्या. तर मुर्गन अश्विन आणि फॅबिएन एलेनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, किरोन पोलार्ड, फॅबियन एलन, जयदेव उनादकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि टाइमल मिल्स.
लखनऊ प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, दीपक हुड्डा,मार्कस स्टोइनिस, आयुष बदोनी, जेसन होल्डर, क्रुणाल पांड्या, दुष्मंथा चमीरा, आवेश खान आणि रवि बिश्नोई.