मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं. त्यानंतर या 15 व्या मोसमातील मेगा ऑक्शनमध्ये फ्रँचायजीने 30 लाख रुपये मोजून अर्जुनला पुन्हा आपल्याकडे घेतलं. मुंबईला 15 व्या मोसमातील 9 सामन्यांपैकी 8 सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. तर राजस्थान विरुद्ध एकमेव विजय मिळवता आला. (ipl 2022 mumbai indians why not give chance to makes debut for arjun tendulkar netizens asked aggresive question)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईची या मोसमात बिकट स्थिती झाली. सलग पराभवांमुळे मुंबईचं या मोसमातील आव्हान संपुष्टात आलं. त्यानंतरही मुंबई टीम अर्जुनला पदार्पणाची संधी देत नाहीयेत. 


टीम मॅनेजमेंट गुजरात विरुद्धच्या सामन्यात तरी अर्जुनला संधी देतील, अशी फार शक्यता होती. मात्र अर्जुनला काही संधी दिली नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. खेळवायचं नाही मग घेता कशाला? अर्जुनला संधी न दिल्याने नेटकऱ्यांचा संतप्त सवाल नेटकऱ्यांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे. 


मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेविड, कायरन पोलार्ड, डेनियल सैम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह आणि रिले मेरेडिथ.


गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, प्रदीप सांगवन, लॉकी फर्ग्यूसन, अल्जारी जोसेफ आणि मोहम्मद शमी.