IPL 2022 : इंडिय प्रीमिअर लीगच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामासाठी 12 आणि 13 फेब्रुवारीला खेळाडूंचा मेगा ऑक्शन (IPL Mega Auction) पार पडला. यंदा तब्बल 10 संघ मैदानात उतरणार आहेत, त्यामुळे रंगत आणखी वाढली आहे.  मेगा ऑक्शननंतर आता क्रिकेटप्रेमींना आयपीएलच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा आयपीएल स्पर्धा भारतातच खेळवली जाणार हे निश्चत झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 10 संघांमध्ये तब्बल 70 सामने खेळवले जाणार आहेत. बीसीसीआय (BCCI) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातले तब्बल 55 सामने मुंबईत खेळवले जाणार असल्याची माहिती आहे. मुंबईत वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डी वाय पाटील स्टेडिअमवर  हे सामने खेळवले जाणार असल्याची माहिती आहे. तर 15 सामने पुण्यात खेळवले जाणार असल्याची शक्यता आहे. 


आयपीएलचे संघ वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडिअमवर एकमेकांबरोबर प्रत्येकी चार सामने खेळतील. तर ब्रेबॉर्न आणि पुण्यात प्रत्येकी 3 सामने खेळले जातील. 


आयपीएलच्या पंधराव्या हंगामाच्या उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यावरुन दोन तारखांवर विचार सुरु आहे. ब्रॉडकास्टर 26 मार्चपासून स्पर्धा सुरु करण्याबाबत सकारात्मक आहेत. तर बोर्डाने 27 मार्चला स्पर्धेचं उद्घाटन करण्याची योजना आखली आहे. आता यातल्या कोणत्या तारखेचा मुहूर्त मिळतो, हे लवकरच स्पष्ट होईल, असं असलं तरी कोणत्याही परिस्थितीत आयपीएलचा अंतिम सामना 29 मेला खेळवला जाणार हे निश्चित आहे. 


असा असले आयपीएल 2022 चा फॉर्मेट?
- 10 संघांची दोन ग्रुपमध्ये विभागणी होईल, ग्रुप ए मध्ये पाच तर ग्रुप बीमध्ये पाच संघ असतील


- प्रत्येक संघ साखळीत एकूण 14 सामने खेळेल


- प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर दोन सामने खेळेल


- दुसऱ्या ग्रुपमधल्या एका संघाबरोबर दोन सामने खेळावे लागतील


- ग्रुपमधले इतर चार संघ दुसऱ्या ग्रुपमधल्या संघाबरोबर प्रत्येकी एक मॅच खेळेल


प्लेऑफचे सामने कुठे खेळवले जाणार हे अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही. 24 फेब्रुवारीला होणाऱ्या आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. बैठकीत स्पर्धेची तारीख, जागा आणि प्लेऑफवर अंतिम निर्णय अपेक्षित आहे. गुरुवारी याबाबतचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर होऊ शकतं.