मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 2022 सिझनच्या काऊंटडाऊन सुरुवात झाली आहे. दरम्यान या आयपीएलदरम्यान अनेक मोठे बदलाव करण्यात आले आहेत. कोरोनाचं संकट पाहता आयपीएलचे सामने केवळ 4 मैदानावर खेळला जाणार आहे. यावेळी परिस्थिती पाहता बीसीसीआयकडून सर्व तयारी केली जातेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच आता एक प्रश्न उपस्थित होतोय की, आयपीएल सुरु झाल्यानंतर कोणत्या टीममध्ये कोरोना पॉझिटीव्ह खेळाडू किंवा सदस्य सापडला तर काय होईल. अशामध्ये नव्या नियमांप्रमाणे, जर सामना सुरु होण्याच्या काही काळ अगोदर टीममधील एखाद्याला कोरोनाचं प्रकरण समोर आलं आणि त्याचसोबत टीम त्यांच्या 12 खेळाडूंना मैदानात उतरवण्यास अयशस्वी ठरली त्यावेळी काही गोष्टी बदलतील.


प्रत्येक टीममध्ये सामन्यापूर्वी 12 खेळाडू सांगावे लागतात. यामध्ये प्लेईंग 11मध्ये 11 आणि एक 12 वा खेळाडू जो सबस्टिट्यूट म्हणून उपलब्ध असतो. यामध्ये 7 खेळाडू भारताचे असणं गरजेचं आहे. जर हे 12 खेळाडू त्यावेळी उपलब्ध नसतील तर सामन्याला इतर दिवशी खेळला जाण्याचा विचार केला जाईल. 


टेक्निकल समितीचा अंतिम निर्णय


जर असं करणं संभव नसेल तर यासंबंधी आयपीएलच्या टेक्निकल समितीला नोटीस पाठवली जाईल. यावेळी समिती जो निर्णय घेईल, तो अंतिम असणार आहे. यापूर्वी अशी परिस्थिती निर्माण होत होती त्यावेळी समोरच्या टीमला दोन पॉईंट्स देण्यात येत होते.


DSR च्या नियमातही बदल करण्यात आला आहे. प्रत्येक डावात एका ऐवजी दोन रिव्ह्यू घेता येणार आहे. जर एखादा फलंदाज कॅट आऊट झाला तर बदलेल्या स्ट्राइकला गृहित धरलं जाणार नाही. नवा फलंदाज क्रिझवर येईल. पण कॅच जर ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर घेतला असेल तर स्ट्राइक बदलेली गृहित धरली जाणार आहे.