मुंबई : सध्या क्रिकेट विश्वात आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) हवा आहे. मोठ्या उत्साहात आयपीएलचे सामने पार पडत आहे. आयपीएलचा उत्साह असताना दुसऱ्या बाजूला दिग्गज क्रिकेटपटूने अचानक-भयानक मोठा निर्णय घेतला आहे. या स्टार खेळाडूनं निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. या तडकाफडकी निर्णय घेतल्याने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. (ipl 2022 nz new zealand star and senior batsman ross taylor retired in international cricket)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉस टेलरने (Ross Taylor) क्रिकेट विश्वाला अलविदा (Ross Taylor Retirment) केला आहे. नेदरलँड विरुद्ध एकदिवसीय मालिका ही त्याच्या कारकिर्दीतील अखेरची मालिका ठरली. या मालिकेनंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा रॉसने याआधीच केली होती. 


या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने नेदरलँडवर 115 धावांनी विजय मिळवला. या तिसऱ्या सामन्यात रॉस टेलरने 14 धावांची खेळी केली. 


रॉसची आयपीएल कारकिर्द


रॉस आयपीएलच्या 55 सामन्यांमध्ये खेळला आहे. यामध्ये त्याने 123.72 च्या स्ट्राईक रेटने आणि 25.43 आणि सरासरीने 1 हजार 17 धावा केल्या होत्या. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश होता. रॉसने आयपीएलच्या इतिहासात आरसीबी, दिल्ली, राजस्थान रॉयल्स आणि पुणे या संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.