IPL 2022 : विजयाची हॅट्रिक करण्यात हार्दिक पांड्या यशस्वी होणार?
गुजरात- पंजाब आज आमनेसामने, पाहा कसं असणार दोन्ही टीमचं प्लेइंग इलेव्हन
मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 16 वा सामना गुजरात विरुद्ध पंजाब आज होत आहे. हा सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. गुजरातने दोन समाने खेळून दोन्हीत विजय मिळवला आहे. पंजाब हा चौथा सामना खेळणार आहे. 3 पैकी दोन सामन्यात विजय आणि एक पराभव स्वीकारावा लागला.
गुजरातमध्ये हार्दिक पांड्या मॅथ्यू वेड आणि विजय शंकरबाबत मोठा निर्णय घेऊ शकते. सध्या दोघंही खराब फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे या दोघांना हार्दिक पांड्या एक संधी देणार की नाही हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अभिनवला अजून फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. त्याला कोणत्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. हार्दिक पांड्या आता फलंदाजीमध्ये कोणत्या क्रमाने उतरवणार हे पाहावं लागेल. शुभमन गिलकडून यावेळी अधिक धावांची अपेक्षा आहे.
पंजाब टीममध्ये देखील बदल होऊ शकते. भानुका की बेयरस्टो कोणाला संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे. की के एल राहुल दोघांनाही संधी देऊन दुसऱ्या कोणत्या खेळाडूला बाहेर बसवणार हे पाहावं लागणार आहे.
पंजाब टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, भानुका राजपक्षे/जॉनी बेयरस्टो , लियाम लिविंगस्टन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, कागिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोडा, अर्शदीप सिंह आणि ओडियन स्मिथ
गुजरात टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
हार्दिक पांड्या (कर्णधार), मॅथ्यू वेड (विकेटकीपर), शुभमन गिल, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, राशिद खान, वरुण आरोन, लॉकी फर्ग्यूसन आणि मोहम्मद शमी