मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या मोसमातील 11 वा सामन चेन्नई विरुद्ध पंजाब झाला. पंजाब जरी चेन्नई विरुद्धचा सामना जिंकलं असेल तरी एकूण त्याची परिस्थिती धोक्याची स्थिती दिसत आहे. पंजाबकडे उत्तम फलंदाजांची फळी आहे. पण त्यांची सर्वात मोठी अडचण कर्णधार आहे. या सगळ्या परिस्थितीचा विचार करता पंजाब लवकच मोठा निर्णय घेऊ शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीमची चांगली कामगिरी आहे मात्र कर्णधाराच्या कामगिरीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं जात आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात मयंक अवघ्या 4 धावा करून तंबुत परतला.  मुकेश चौधरीने त्याची विकेट काढली. याआधीही मयंक केकेआरविरुद्ध 1 धावा काढून बाद झाला होता. बंगळुरू विरुद्धच्या पहिल्या सामन्यात मयंकने 32 धावा केल्या होत्या.


मयंक अग्रवालची अशी खराब कामगिरी पाहून पंजाबचा संघ लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतो. असेच सुरू राहिल्यास हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांनंतरच मयंककडून संघाचे कर्णधारपद काढून घेतलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंजाबकडे कर्णधारपदासाठी शिखर धवनसारखा अनुभवी खेळाडू आधीच आहे. आतापर्यंतची कामगिरी पाहता मयंकला टीममधून बाहेर काढलं जाऊ शकतं. 


पंजाबकडे शिखर धवन, लियाम लिविंगस्टोन, जॉनी बेयरस्टो आणि ओडियन स्मिथसारखे धुरंधर खेळाडू आहेत. बॅटिंगलाईन मजबूत असल्याचा पंजाबला मोठा फायदा आहे. जॉनी बेयरस्टो, शाहरुख खान मिडल ऑर्डरवर भर देतात तर ओडियन स्मिथ उत्तम फिनिशरचं काम करतो. टीमचं संतुलन चांगलं असल्याने त्याचे चांगले परिणाम मैदानात दिसतात. 


पंजाब टीम
मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, अर्शदीप सिंह, कागिसो रबाडा, जॉनी बेयरस्टो, राहुल चाहर, हरप्रीत बरार, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंह, जितेश शर्मा, ईशान पोरेल, लियाम लिविंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, ऋषी धवन, प्रेरक मांकड, वैभव अरोडा, रितिक चटर्जी, बलतेज ढांडा, अंश पटेल, नाथन एलिस, अथर्व ताएदे, भानुका राजपक्षे, बेनी हॉवेल.