मुंबई : आयपीएलचा 15 वा मोसम (IPL 2022) रंगतदार स्थितीत पोहचला आहे. गुजरात टायटन्सने लखनऊला पराभूत करत प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे उर्वरित 3 जागांसाठी इतर संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळतेय. या सर्वात आता आयपीएलमध्ये 'मिस्टर 360' म्हणून ओळखला जाणारा आरसीबीचा आक्रमक फलंदाज आणि फिल्डर एबी डी व्हीलियर्स (AB de Villiers) परतणार असल्याचे संकेत आरसीबीचा बॅट्समन आणि माज कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने दिले आहेत. (ipl 2022 rcb virat kohli gived hint about mister 360 ab de villers will be back in ipl next season)


विराट काय म्हणाला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मला एबीची खूप आठवण येते. मी एबीसोबत नियमितपणे बोलतो. एबी त्याच्या कुटुंबियांसोबत अमेरिकेत गोल्फ पाहायला गेला होता. त्याचं आरसीबीच्या कामगिरीवर लक्ष असतं. तसेच एबी पुढील आयपीएलमध्ये टीममध्ये नव्या भूमिकेत दिसेल", असा आशावाद विराटने आरसीबीच्या ट्विटर हॅंडलवर बोलताना व्यक्त केला. 


विराट आऊट ऑफ फॉर्म 


विराटला या 15 व्या मोसमात आतापर्यंत फार झगडावं लागलंयं. विराटला धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. विराटने या हंगामातील 14 सामन्यात 216 धावा केल्या आहेत. तसेच विराट 3 वेळा शून्यावर आऊट  झालाय.त्यामुळे विराटवर सडकून टीका होतेय.