मुंबई : कोलकाता विरुद्धच्या सामन्यात बंगळुरू टीमने 3 विकेट्सने सामना जिंकला आहे. हा सामना खूप रोमांचक होता. शेवटच्या ओव्हरमध्ये दिनेश कार्तिकने एक चौकार आणि षटकार ठोकून बंगळुरू संघाला विजय मिळवून दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामन्यात एक अजब घटना घडली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बंगळुरू संघाच्या दोन फलंदाजांनी रन काढताना खूप मोठी गडबड केली. 


बंगळुरूच्या 19 व्या ओव्हरमध्ये हस्यास्पद घटना घडली. या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर कार्तिकने अय्यरच्या बॉलवर ऑफ साइड शॉट मारला. यावेळी रन काढण्यासाठी दोघंही धावले. दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेल दोघंही एकाच लेनवर येऊन थांबले.


दोघांमध्ये घोळ झाला आणि ते एकाच दिशेला येऊन थांबले त्यामुळे मोठी गडबड झाली. विजय मिळवायचा असल्याने प्रत्येक रन टीमसाठी महत्त्वाचा होता. त्याच दरम्यान ही चूक घडली आणि दोन्ही बॅट्समन एकाच एन्डवर येऊन थांबले. 


उमेशने फेकलेला एक बॉल योग्य दिशेनं गेला नाही. त्यामुळे कार्तिकला दुसरा रन काढण्यासाठी वेळ मिळाला. फिल्डिंगमधील लूपहोल आणि चुकीच्या थ्रोचा फायदा बंगळुरू संघाला झाला. या सगळ्या गोंधळात दिनेश कार्तिकला रनही मिळाला आणि तो आऊटही झाला नाही. 


कोलकाताच्या फिल्डिंगमधील चुकीमुळे श्रेयस अय्यर निराश झाला. त्याने मैदानात मान खाली घातल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. कोलकाताच्या छोट्या छोट्या चुका बंगळुरूसाठी फायद्याच्या ठरल्या. त्यांनी याचा फायदा घेऊन सामन्यावर विजय मिळवला.