IPL 2022, RCB vs KKR | विराटला `हा` मोठा कारनामा करण्याची संधी
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सहावा सामना आज (30 मार्च) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात कोलकाता विरुद्ध आरसीबी (KKR vs RCB) आमनेसामने भिडणार आहेत.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सहावा सामना आज (30 मार्च) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात कोलकाता विरुद्ध आरसीबी (RCB vs KKR) आमनेसामने भिडणार आहेत. आरसीबीची या मोसमाची सुरुवात पराभवाने झाली. आरसीबीने 205 धावा करुनही पंजाबकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र आरसीबीच्या खेळाडूने दमदार कामगिरी केली. फॅफ डु प्लेसिस आणि विराट कोहलीने चमकदार कामगिरी केली. (ipl 2022 rcb vs kkr virat kohli have need to 3 fours for complete 550 fours)
त्यामुळे कोलकाता विरुद्धच्या या सामन्यातही आरसीबी फ्रँचायजीला खेळाडूंकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे. पंजाब विरुद्धच्या सामन्यात बंगळुरुचा माजी कर्णधार विराट कोहलीने धमाका केला. त्याने 29 बॉलमध्ये 41 धावा केल्या. आता केकेआर विरुद्धच्या आजच्या सामन्यात विराटचा एका खास रेकॉर्डवर असणार आहे.
विराटने आयपीलमध्ये आतापर्यंत 547 फोर लगावले आहेत. विराटने कोलकाता विरुद्धच्या या सामन्यता 3 चौकार लगावल्यास, तो स्पर्धेत 550 चौकार मारणारा दुसरा फलंदाज ठरेल.
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकारांचा विक्रम हा 'गब्बर' शिखर धवनच्या नावावर आहे. धवनने आतापर्यंत एकूण 656 फोर मारले आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानी डेव्हिड वॉर्नर आहे. वॉर्नरने 525 फोर मारले आहेत.
त्यामुळे आता विराट कोहली कोलकाता विरुद्धच्या सामन्यात 3 चौकार मारत ही अनोखी कामगिरी करणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.