पुणे : सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) वादळी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) विजयासाठी 152 धावांचे आव्हान दिले आहे. मुबंईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्सने गमावून 151 धावा केल्या. अडचणीत सापडलेल्या मुंबईला सूर्यकुमारने नवसंजीवणी दिली. सूर्यकुमारने सर्वाधिक 68 धावांची नाबाद खेळी केली.  (ipl 2022 rcb vs mi mumbai indians set 152 runs target for winning to royal challengers bangalore at pune)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्याने  68 धावांच्या खेळीत 5 फोर आणि 6 खणणखीत सिक्स मारले. या शिवाय इशान किशन आणि कॅप्टन रोहित शर्मा या दोघांनी प्रत्येकी 26 धावांची खेळी केली.  मुंबईची शानदार सुरुवात झाली. मात्र आरसीबीच्या भेदक माऱ्यासमोर मुंबईच्या मीडल ऑर्डरने शरणागती पत्कारली. टिलक वर्मा आणि कायरन पोलार्ड या दोघांना तर भोपळाही फोडता आला नाही. 


आरसीबीकडून वानिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर आकास दीपने 1 विकेट मिळवली.


आरसीबी प्लेइंग इलेव्हन :  फाफ डु प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), डेविड विली, वनिंदु हसरंगा, हर्षल पटेल, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.  


मुंबई इंडियंसची 'पलटण' :  रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरोन पोलार्ड, रमनदीप सिंह, मुरुगन अश्विन, जयदेव उनादकट, जसप्रीत बुमराह आणि बासिल थंपी.