मुंबई : हार्दिक पांड्याच्या टीमने छोबीपछाड केल्यानंतर दिल्ली टीमला पराभव स्वीकारावा लागला. दिल्ली टीममध्ये काही धुरंधर खेळाडूंची कमी होती. ही कमतरता पुढच्या सामन्यात भरून निघणार आहे. त्यामुळे दिल्लीचे कोच रिकी पाँटिंग यांनी इतर टीमला इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली टीममध्ये धुरंधर खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे ऋषभ पंत थोडा निर्धास्त झाला. कोलकाता विरुद्ध 7 एप्रिलला दिल्लीचा सामना आहे. या सामन्यात धुरंधर खेळाडू खेळताना दिसतील. 


गुजरातविरुद्ध सामन्यात दिल्लीला 14 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीचा या मोसमातील हा पहिला पराभव आहे. हा सामना हरल्यानंतर दिल्लीचे कोच रिकी पाँटिंग नाराज होते. पुढच्याच सामन्यात पुन्हा नव्या ऊर्जेनं उतरू असा इशारा त्यांनी इतर टीमना दिला. 


दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्टिजे लवकरच बरा होऊन टीममध्ये येईल. 7 एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता आहे. गेल्या टी 20 वर्ल्ड कपपासून तो दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता.


नॉर्टिजेने सराव सुरू केला आहे. त्याला आणखी थोडा सराव आवश्यक आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डनं परवानगी दिली की तो पुढच्या सामन्यासाठी खेळू शकेल. वॉर्नर मुंबईत आला आहे त्यामुळे तो पुढच्या सामन्यासाठी उपलब्ध होईल. 


कोलकाता विरुद्धच्या सामन्यासाठी मार्श टीममध्ये खेळणं अपेक्षित आहे असं यावेळी बोलताना पाँटिंग म्हणाले. एनरिक सध्या दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेकडून खेळण्याची परवानगी मिळाल्यानंतर तो टीममध्ये येईल. 


दिल्ली टीमने मुंबई इंडियन्सचा 4 विकेट्सने पराभव केला होता. तर हार्दिक पांड्याची टीम गुजरातकडून दिल्लीला केवळ 14 धावांसाठी पराभवाचा सामना करावा लागला.