मुंबई : आयपीएलमधील 13 वा सामना वानखेडे स्टेडियमवर होत आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. राजस्थान टीमने यावेळी आयपीएलची दणदणीत सुरुवात केली. बंगळुरू टीमला दोन सामन्यांमध्ये एक विजय एक पराभव मिळाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान टीमने खूप चांगली कामगिरी केली आहे. मुंबई टीमला 23 धावांनी पराभूत केलं. जोस बटलरने शतक पूर्ण केलं. 193 धावा करण्यात टीमला यश मिळालं. आताच्या सामन्यातही राजस्थानकडून उत्तम कामगिरी राहिल हीच अपेक्षा अनेकांना आहे. 


राजस्थान विरुद्ध बंगळुरू आतापर्यंत 25 सामने खेळले आहेत. त्यापैकी 12 सामने बंगळुरूने जिंकले आहेत. तर 10 सामने राजस्थानने जिंकले आहेत. 3 सामने अनिर्णित राहिले आहेत. 


बंगळुरू टीमची कमान फाफ डु प्लेसिसकडे आहे. तिसऱ्या सामन्याधी एक मोठा धक्का बसला आहे. ग्लॅन मॅक्सवेल या सामन्यात खेळणार नाही अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे बंगळुरूला आजचा सामना जिंकणं मोठं आव्हान असणार आहे. 


ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 6 एप्रिलपर्यंत कोणत्याही राखून ठेवलेल्या किंवा विकत घेतलेल्या खेळाडूला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे मॅक्सवेल आजचा सामना खेळू शकणार नाही. 


राजस्थान टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन : 


जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, नवदीप सैनी, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा


बंगळुरू टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन : 


फाफ डु प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहबाज अहमद, वनिन्दु हसरंगा, डेव्हिड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज