मुंबई : आपल्या जबरदस्त फलंदाजीने मैदान गाजवणारा गब्बर मोठ्या पडद्यावर दिसणार अशी चर्चा रंगली आहे. शिखर धवन लवकरच बॉलिवूडमध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार शिखर धवन लवकरच एका सिनेमात दिसणार आहे. तो अभिनय करण्यासाठी तयार आहे. स्ट्रीम फिल्मचा भाग होण्यासाठी तो तयार आहे. 


मेन स्ट्रीम चित्रपटात तो दिसणार असल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिखरने त्याच्या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केले आहे. सध्या या चित्रपटाचे शीर्षक जाहीर करण्यात आलेले नाही. 


शिखरला जेव्हा या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा त्याने लगेच होकार दिला असल्याची चर्चा आहे. शिखरचा चित्रपट या वर्षीच रिलीज होणार असल्याची माहिती मिळाली आहे. शिखर धवन चित्रपटात खरंच दिसणार का? याबाबत अद्याप त्याने अधिकृत कोणतीच माहिती दिली नाही.


शिखर धवन यंदा आयपीएलमध्ये पंजाब टीमकडून खेळत आहे. 13 सामन्यांत त्याने 421 धावा केल्या आहेत.  त्याने 45 चौकार आणि 10 षटकार ठोकले आहेत. 2021 मध्ये शिखर धवनने 16 सामने खेळून 587 धावा केल्या होत्या.