IPL 2022 | आयपीएलमध्ये या हॉट Anchor ची एन्ट्री, चाहते सुखावले
आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमाला दणक्यात सुरुवात झाली आहे. या मोसमात एका हॉट Anchor ची तब्बल 2 वर्षांनंतर एन्ट्री झाली आहे.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमाला दणक्यात सुरुवात झाली आहे. या मोसमात एका हॉट Anchor ची तब्बल 2 वर्षांनंतर एन्ट्री झाली आहे. या Anchor च्या एन्ट्रीमुळे चाहत्यांच्या जीवात जीव आलाय. चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. लोकप्रिय असलेल्या मयंती लँगरची (Mayanti Langer) एन्ट्री आयपीएलमध्ये पुन्हा एकदा एन्ट्री झाली आहे. (ipl 2022 sports anchor and former team india cricketer stuart binny wife mayanti langer is back after 2 years)
मयंतीचा एक सेपरेट असा स्वत:चा फॅनबेस आहे. क्रिकेट चाहते जितके सामना पाहण्यासाठी उत्सुक असतात, त्यापेक्षा अधिक मयंतीला पाहण्यसाठी ते उत्सूक असतात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
मयंती 2 वर्ष कुठे होती?
मयंती 2020 मध्ये आई झाली. तिला पुत्ररत्न प्राप्त झालं. आपल्या चिमुकल्या मुलाला वेळ देण्यासाठी मयंतीला काही काळ ब्रेक घ्यावा लागला. यामुळे मयंती गेल्या 2 मोसमापासून दूर होती.
मयंतीबाबत थोडक्यात
मयंती ही टीम इंडियाचा माजी खेळाडू स्टुअर्ट बिन्नीची बायको आहे. स्टुअर्ट आणि मयंती या दोघांनी अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2012 मध्ये लग्न केलं. मयंतीने बिन्नीची मुलाखत घेतली होती. इथून यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली.
मयंती हे भारतीय क्रीडा विश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. मयंती गेल्या 15-16 वर्षांपासून ती प्रत्येक मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये निवेदिका म्हणून सहभागी राहिली आहे. मयंतीने 2010 कॉमनवेल्थ गेम्स, फिफा वर्ल्ड कप 2010 , क्रिकेट वर्ल्ड 2011, तसेच आयपीएल यासारख्या अनेक स्पर्धांमध्ये तिने आपल्या एँकरिंग केलीय.