मुंबई : कॅप्टन केएल राहुल (K L Rahul) आणि दीपक हुड्डाच्या (Deepak Hudda) अर्धशतकी खेळीच्या जोरावर लखनऊ सुपर जायंट्सने  (Lucknow Super Giants) सनरायज हैदराबादला (Sunrisers Hyderabad) 170 धावांचे आव्हान दिले आहे. लखनऊने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. (ipl 2022 srh vs lsg lucknow super giants set 170 runs target for winning to sunrisers hyderabad)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लखनऊकडून केएल राहुलने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. तर दीपक हुड्डाने 51 रन्सचं योगदान दिलं. त्याशिवाय आयुष बदोनीने 19 रन्स केल्या. तर मनिष पांडेने 11 धावा केल्या. या व्यतिरिक्त लखनऊच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. हैदराबादकडून वॉशिंग्टन सुंदर, रोमारियो शेफर्ड आणि टी नटराजनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. 


अशी आहे दोन्ही संघांचे अंतिम 11 खेळाडू


लखनऊ सुपर जायंट्स | 


केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मनीष पांडे, इविन लुईस, दीपक हुड्डा, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, जेसन होल्डर, एंड्र्यू टाय, रवी बिश्ननोई आणि आवेश खान. 


सनरायजर्स हैदराबाद |


केन विलियमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, एडन मार्करम, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (विकेटकीपर),  अब्दुल समद, रोमारियो शेफर्ड, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक आणि टी नटराजन.