मुंबई : आयपीएलची सुरुवात 26 मार्चपासून होणार आहे. चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना होणार आहे. यंदाच्या मोसमात 3 धडाकेबाज खेळाडू मात्र खेळताना दिसणार नाहीत. अवघ्या काही बॉलमध्ये गेम चेंजर ठरणारे हे खेळाडू यंदा मात्र आयपीएलच्या मैदानापासून दूर राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. कोण हे तीन खेळाडू आहेत जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. एबी डिव्हिलियर्स
RCB संघातून खेळणारा एबी डिव्हिलियर्स यंदा मैदानात खेळताना दिसणार आहे. 360 डिग्रीचा मास्टर म्हणून त्याची एक वेगळी ओळख होती. कमी बॉलमध्ये जास्त धावा मिळवून देणारा हुकमी एक्का आरसीबीकडून गेला आहे.  डिव्हिलियर्सने गेल्या वर्षीच निवृत्ती जाहीर केली होती. 


डिव्हिलियर्सने आयपीएलच्या 184 सामन्यात 5162 धावा केल्या आहेत. त्याने शानदार कारकिर्दीत तीन शतके आणि 40 अर्धशतके केली आहेत. आरसीबी संघाने त्याला आपला मार्गदर्शक बनवले आहे.


2. अमित मिश्रा
आयपीएलमध्ये अमित मिश्राने दमदार कामगिरी केली होती. 164 सामन्यात 166 विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या आयपीएल ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिल्याने तो यंदा आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. 
3.पीयूष चावला
मेगा ऑक्शनमध्ये पीयूष चावलावर कोणीही बोली न लावल्याने अनसोल्ड राहिला आहे. त्यामुळे पीयूष चावला आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही.