AB de Villiers And Danielle: अंगाने काटक आणि स्टायलिश प्लेयर कॉलर टाईट करून मैदानात आला की, सर्वांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद पहायला मिळायचा. साऊथ अफ्रिकेच्या या खेळाडूने आपल्या टॅलेंटच्या जोरावर जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. आजची क्रिकेट चाहते त्याला मिस्टर 360 म्हणून ओळखतात. डिव्हिलियर्सने (AB de Villiers) आयसीबीकडून (RCB) खेळताना भारतीयांच्या हृदयात वेगळं स्थान मिळवलंय. यंदाची आयपीएल (IPL 2023) सुरू होण्याआधी आरसीबीने त्याची 17 नंबरची जर्सी रिटायर्ट केलीये. त्यानंतर त्याने पहिल्या सामन्यात आरसीबीला सपोर्ट करण्यासाठी मैदानात हजेरी लावली होती. त्यानंतर आता डिव्हिलियर्सचा एक व्हिडिओ (AB de Villiers Video) सध्या व्हायरल होताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एबीने  (AB de Villiers) आता आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे, परंतु आरसीबीशी त्याचं नातं अद्याप तुटलेलं नाहीत, याची प्रचिती देणारा हा व्हिडिओ आहे. आयपीएलच्या जीओ सिनेमाच्या (IPL on Jio Cinema) एका मुलाखतीत, डिव्हिलियर्स आणि त्याची पत्नी डॅनियल (AB De Villiers Wife Danielle) पोहोचली होती. त्यावेळी पती पत्नीमध्ये भांडण झाल्याचं पहायला मिळालं. (IPL 2023 AB de Villiers fight with Wife Danielle over Support KKR And RCB Said Shahrukh Khan Is Her Love)


Team India: ना पांड्या ना सूर्या, AB De Villiers म्हणतो, 'हा' खेळाडू भारताचा कॅप्टन होणार! 


AB de Villiers चं भाडण का झालं?


केकेआर आणि आरसीबी (KKR vs RCB) यांच्यातील सामन्यापूर्वी एबी डिव्हिलियर्स आणि त्याची पत्नी डॅनियल (Danielle) यांना विचारण्यात आले की ते कोणत्या संघाला सपोर्ट करत आहेत. या प्रश्नाच्या उत्तरात डिव्हिलियर्सने लगेच आरसीबीचे नाव घेतले पण त्याची पत्नी डॅनियल केकेआरला सपोर्ट करत होती. त्यावेळी दोघांमध्ये वाद (AB de Villiers Danielle fight) पेटल्याचं दिसून आलंय.


पाहा video 



दरम्यान, डॅनियलचे उत्तर ऐकून डिव्हिलियर्स चकित झाला आणि डॅनियलकडे पाहू लागला. केकेआर शाहरुख खानची (Shah rukh Khan) टीम आहे आणि शाहरुख माझं प्रेम आहे, असं म्हणताच डिव्हिलियर्सचे डोळे उघडेच्या उघडेच राहिले. त्यानंतर डॅनियल सोफ्यावरून उठून गेल्याचं दिसून आलं. या लाईव्ह शोचा टीझर जिओ सिनेमाने ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.