IPL 2023 Auction: IPL 2023 चा लिलाव सुरु करण्यात आला आहे. 2.30 वाजल्यापासून हा लिलाव सुरु झाला असून यामध्ये एकूण 405 खेळाडूंचा समावेश आहे. 405 क्रिकेटपटूंपैकी 273 भारतीय खेळाडू आहेत, तर 132 परदेशी खेळाडू लिलावामध्ये असतील. 132 पैकी फक्त 30 खेळाडू सिलेक्ट होणार आहेत. तर टीम्समध्ये 87 खेळाडूंसाठी जागा रिकामी असून तितक्यात खेळाडूंवर बोली लागणार आहेत.


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    या लिलावासाठी एकूण 991 खेळाडूंनी रिजस्ट्रेशन केलंय. यामध्ये 714 भारतीय आणि 277 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

  • या 991 खेळाडूंपैकी 10 फ्रेंचायझी टीम्सनी 369 खेळाडूंना ऑक्शनसाठी निवडलंय. याशिवाय 36 खेळाडूंना लिलावात सामील करण्याची विनंतीही करण्यात आली होती. 

  • यंदाच्या आयपीएलच्या हंगामात आता एकूण 405 खेळाडूंचा ऑक्शन लिस्टमध्ये यादीत समावेश करण्यात आला आहे.

  • दरम्यान 405 खेळाडूंपैकी 273 भारताचे आणि 132 विदेश खेळाडू आहेत. परदेशी खेळाडूंमध्ये 4 खेळाडू असोसिएट देशांचे असल्याची माहिती आहे.

  • ऑक्शनमध्ये सहभागी असलेल्या 405 खेळाडूंपैकी 119 खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. तर 282 खेळाडू अनकॅप्ड आहेत.

  • 10 फ्रेंचायझी टीम्समध्ये एकूण 87 खेळाडूंसाठी जागा रिक्त आहेत. यापैकी 30 खेळाडू परदेशी असू शकतात.

  • या ऑक्शनमध्ये 19 खेळाडूंची बेस प्राईज 2 कोटी म्हणजेच सर्वाधिक आहे. हे सर्व खेळाडू परदेशी असणार आहेत.

  • मिनी ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडे (Kolkata Knight Riders) 7.05 कोटी शिल्लक आहेत.

  • गतविजेत्या गुजरात टायटन्सकडे (Gujarat Titans) 19.25 कोटी असल्याने गुजरातचा संघ आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे.

  • चेन्नई सुपर किंग्जकडे (Chennai Super Kings) 20.45 कोटी असल्याने धोनी कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.