Sam Curran:  पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामासाठी आज (23 डिसेंबर) मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) कोचीमधील (Kochi) फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडत आहे. त्यामुळे क्रिडाप्रेमी लिलाव कार्यक्रमाची (TATA Indian Premier League Mini Auction) आतुरतेनं वाट पाहत असल्याचं दिसतंय. या लिलावात एकूण 405 खेळाडूंचा सहभाग नोंदवला आहे. अशातच आता मोठी माहिती समोर आली आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली आहे. (IPL 2023 Auction Sam Curran To Punjab Kings For Rs 18.5 crores marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर सॅम करनला (Sam Curran) आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली आहे. सॅम करनला पंजाब किंग्जने (Panjab Kings) तब्बल 18 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केलं आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्स (Mumbai indians) आणि राजस्थान रॉयल्स (Rajastan royals) यांच्यात भिडत लागली होती. मात्र, अचानक पंजाब किंग्जने (Panjab Kings) ऑक्शनमध्ये उडी मारली आणि सॅम करनला आपल्या ताफ्यात घेतलं.


आयपीएल 2021च्या लिलावात मॉरिसवर 16.25 कोटी इतकी बोली लावली होती. राजस्थान रॉयल्सने त्याला संघात घेतलं होतं. युवराजला 2015 साली 16 कोटींना दिल्ली संघाने खरेदी केलं होतं. पंजाबला एकदाही ट्रॉफी जिंकता आलं नाही. त्यामुळे आता सॅम करनच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागलंय.



दरम्यान, आयपीएलमध्ये 32 सामने खेळणाऱ्या सॅम करनने 23 डावांमध्ये 22.47 च्या सरासरीने 337 धावा केल्या आहेत.  सॅम करन दुखापतीमुळे गेल्या हंगामात तो खेळू शकला नव्हता.  सॅम करनने आयपीएल पदार्पण पंजाब किंग्जकडून केलं होतं. त्यानंतर आता त्याला पुन्हा पंजाबकडून जॅकपॉट लागला आहे.