IPL 2023 Auction: टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) संपल्यानंतर आता सर्वांचं लक्ष लागलंय ते आगामी आयपीएल लिलावाकडे... आगामी आयपीएलच्या16 व्या हंगामासाठी मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) येत्या 23 डिसेंबरला कोचीमध्ये रंगणार आहे. या लिलावाआधी प्रत्येक फ्रँचायजीला रिटेन (IPL 2023 Retentions) आणि रिलीज खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अशातच आता कोण कोणत्या संघात जाणार यावर सध्या क्रिडाविश्वात बैठक बसल्याचं पहायला मिळतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएल लिलावात (IPL Auction 2023) एका स्टार खेळाडूची सर्वात महागडी विक्री होऊ शकते. हा खेळाडू घातक गोलंदाजी आणि तुफानी बॅटिंगमध्ये माहिर आहे. या खेळाडूने T20 वर्ल्ड कपमध्ये अप्रतिम कामगिरी देखील केली आहे. सर्वांना प्रश्न पडला असेल का खेळाडू नेमका कोणता? तर थांबा...


सर्वात महागडा खेळाडू?


आयपीएल 2023 साठी होणाऱ्या लिलावात इंग्लंडचा घातक अष्टपैलू खेळाडू सॅम करन (Sam Curran) सर्वात महागडा खेळाडू (Most Expensive player) ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक संघ त्याला विकत घेण्यासाठी उत्सुकता दाखवेल. सॅम उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून तो T20 क्रिकेटमध्ये पारंगत आहे. कोणत्याही पिचवर फटकेबाजी करण्याची क्षमता सॅम करनमध्ये आहे.


आणखी वाचा - IPL 2023 Kieron Pollard: मुंबई इंडियन्सचा 'बिग शो' राहणार की जाणार? भज्जी म्हणतो...


दरम्यान, सॅम करनने T20 वर्ल्ड कप इंग्लंडकडून (T20 World Cup 2022) चांगली कामगिरी केली. सॅम इंग्लंडसाठी सर्वात मोठा सामनावीर (Man Of The Series) म्हणून उदयास आला आहे. आयपीएलमध्ये सॅम चेन्नई सुपर किंग्जकडून (Chennai Super Kings) खेळला आहे. त्याने आयपीएलच्या 32 सामन्यांमध्ये 337 धावा केल्या आहेत.