IPL 2023 : आज आयपीएलमध्ये (IPL 2023) चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात चेन्नईचा 7 विकेट्सने विजय झाला आहे. तर पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 18.3 ओव्हर्समध्ये चेन्नईने हे लक्ष्य पूर्ण केलं आहे. या विजयासह चेन्नई सुपर किंग्जचे एकून 8 पॉईंट्स झालेत.


कॉन्वेची तुफान खेळी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादविरूद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा चेन्नईकडून ड्वेन कॉन्वेची बॅट तळपली. कॉन्वेने 57 बॉल्समध्ये 77 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीमध्ये त्याने 12 फोर आणि एक सिक्स लगावली आहे. आजच्या सामन्यात कॉन्वेने नाबाद खेळी केली.


चेन्नईचा यंदाच्या सिझनमधील चौथा विजय


चेन्नईचा यंदाच्या सिझनमधील हा चौथा विजय होता. आतापर्यंत चेन्नईचे सहा सामने झाले असून त्यामध्ये 4 विजय आणि 2 पराभव अशी स्थिती आहे. सध्याच्या घडीला चेन्नईची टीम आठ अंकांसह पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. तर पहिल्या स्थानावर अजूनही राजस्थानची टीम आहे.


सनरायझर्स हैदराबादने 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट्स गमावून 134 रन्स केले. यानंतर त्यांनी चेन्नईसमोर 135 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादची सुरुवात फारच खराब झाली. हैदराबादकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक म्हणजेच 34 रन्सची खेळी केली.


दोन्ही टीम्सची प्लेईंग 11


चेन्नई सुपर किंग्ज: डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), तुषार देशपांडे, महेश तिक्ष्णा, मथिशा पाथीराना, आकाश सिंग.


इम्पॅक्ट प्लेअर- अंबाती रायुडू, ड्वेन प्रिटोरियस, शुभ्रांशू सेनापती, शेख रशीद, राजवर्धन हंगेरगेकर


सनरायझर्स हैदराबादः हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, मयंक मार्कंडे.


इम्पॅक्ट प्लेअर- अब्दुल समद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, मयंक डागर, टी नटराजन