Kane Williamson: केन विलियम्सनचा अखेर आयपीएलला `टाटा गुड बाय`, हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढलं!
Kane Williamson Injury Update: केन विल्यमसन आगामी सामन्यांमध्ये (Gujarat Titans) खेळणार की नाही? यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर आता तो न्यूझीलंडसाठी (New Zealand) रवाना झाला आहे.
Kane Williamson Ruled Out IPL 2023: गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच आयपीएल (IPL 2023) सुरू होण्यापासून खेळाडूंना दुखापतीचं ग्रहण लागल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता गुजरात टायटन्सला (GT) मोठा धक्का बसला आहे. पहिल्या सामन्यात धमाकेदार विजय नोंदवल्यानंतर आता हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) टेन्शन वाढलंय ते गुजरातचा स्टार खेळाडू आणि न्यूझीलंडचा दिग्गज कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) याच्यामुळे...
चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात फिल्डिंग करताना केन विलियम्सन दुखापतग्रस्त झाला होता. अशातच आता केन विल्यमसन संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाल्याची (Kane Williamson Ruled Out IPL 2023) बातमी समोर आली आहे. ऋतुराज गायकवाडने 13व्या षटकात मारलेला शॉट अडवण्यास गेलेल्या विल्यमसनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.
बॉन्ड्रीवर उंच उडी मारली पण झेल घेऊ शकला नाही. मात्र, त्याचा प्रयत्न अप्रतिम होता. त्यानंतर बराच वेळ तो बॉन्ड्रीवर तळमळत होता. त्यावेळी खेळाडूंनी त्याला डगआऊटमध्ये नेलं. त्यामुळे तो खेळणार की नाही? यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. त्यानंतर आता तो न्यूझीलंडसाठी (New Zealand) रवाना झाला आहे.
काय म्हणाला Kane Williamson?
दुखापतीनंतर पहिल्यांदाच केनने पोस्ट केली आहे. त्यावेळी, गेल्या काही दिवसांपासून पाठिंबा दिला आहे त्या लोकांचे आभार. रिकवर होण्यासाठी मी घरी जात आहे. सर्वांचे प्रेम मिळाली, थँक्यू, असं केन म्हणाला आहे.
दरम्यान, केन हा गुजरातचा महत्त्वाचा खेळाडू. मिडल ऑर्डरमध्ये खेळण्यासाठी त्याची खास नियुक्ती केली होती. मात्र, केन खेळणार नसल्याने त्याच्याजागी कोणाला संधी मिळणार यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. केन विलियम्सनच्या जागी मार्टिन गप्टिल हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तर स्टीव स्मिथ याचं नाव देखील चर्चेत आहे. तर एलेक्स हेल्सला देखील संधी मिळण्याची शक्यता आहे.