IPL 2023 : आयपीएल आणि वाद काही नवीन नाही. आयपीएलचा सोळावा हंगामाही याला अपवाद ठरला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्या दरम्यान रंगलेल्या सामन्यात जोरदार राडा झाला. सामना सुरु असताना विराट कोहली (Virat Kohli) आणि लखनऊचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक (Naveen-ul-Haq) यांच्यात शाब्दिक वाद झाला. याचे पडसाद सामना संपल्यानंतर उमटले. यात लखनऊचा मेंटोर गौतम गंभीरनेही (Gautam Gambhir) उडी घेतली आणि हे प्रकरण चांगलेच पेटलं. विराट कोहली आणि गौतम गंभीरच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीनचा धोणीबरोबर फोटो
विराट कोहलीबरोबरच्या वादानंतर अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन उल हक चांगलाच चर्चेत आलाय. आता नवीन उल हकचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन नेटिझन्स विराट कोहलीला ट्रोल करत आहेत. तीन मे रोजी लखनऊच्या अटलबिहारी वाजपेयी ईकाना क्रिकेट स्टेडिअमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्सदरम्यान (CSK) सामना पार पडला. पावसामुळे हा सामना अर्ध्यावरच थांबवण्यात आला. त्यानंतर पॅव्हेलिअनमध्ये लखनऊच्या खेळाडूंनी एमएस धोणीची (MS Dhoni) भेट घेतली. भेटीचे हे फोटो लखनऊ संघाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. 


लखनऊचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकनेही धोणीची भेट घेतली आणि त्याने धोणीबरोबर एक फोटोही काढून घेतला. धोणीने लखनऊच्या खेळाडूंबरोबर आपल्या अनुभव शेअर केला. चेन्नईच्या प्रत्येक सामन्यानंतर धोणी समोरच्या खेळाडूंची भेट घेत असल्याचं व्हिडिओत पाहिला मिळतं. धोणी आणि नवीन उल हकचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवरुन नेटिझन्सकडून विराट कोहलीली ट्रोल केलं जात आहे. नवीन आणि धोणीचा फोटो शेअर करत एका युजरने म्हटलं, इज्जत मागून मिळत नाही, तर कमवावी लागते. तर एका युजरने म्हटलंय लिजंड आणि साध्या खेळाडूंमध्ये हाच फरक असतो.



नवीन उल हकची प्रतिक्रिया
या फोटोवर नवीन उल हकने प्रतिक्रिया दिला आहे. एमएस धोणी हा आपला आदर्श असून त्याची भेट झाल्याने माझं स्वप्न पूर्ण झालंय. शक्य झाल्यास त्याच्या नेतृत्वाखाळी खेळण्याची इच्छा असल्याचं नवीन उल हकने म्हटलंय. धोणीबरोबरचा फोटो घरी फ्रेम करुन लावणार असल्याचंही नवीन उल हकने म्हटलंय. 


विराट-नवीनचा काय होता वाद?
लखनऊचा गोलंदाज नवीनने उल हकने सामन्यादरम्यान बंगलोरच्या विराट कोहलीसोबत वाद घातला आणि त्यात लखनऊचा मेंटोर गौतम गंभीरने उडी घेतल्याने मैदानावरील वातावरण गरम झालं होतं.