IPL 2023, Virender Sehwag On MS Dhoni: आयपीएलचा (IPL 2023) पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK VS GT) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गुजरातने 5 विकेट्सने विजय मिळवला. आयपीएलच्या हंगामात एम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने धोनीवर ताशेरे ओढले आहेत. (IPL 2023 MS Dhoni making these mistakes Sehwag no holds barred attack on CSK skipper for GT loss latest marathi news)


काय म्हणाला Virender Sehwag ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीने मोईन अलीची ओव्हर मध्यभागी कुठंतरी वापरली असती तर महागडा ठरलेल्या तुषार देशपांडेला जाण्याची गरज धोनीला भासली नसती, असं मत विरेंद्र सेहवागने व्यक्त केलं आहे. महेंद्रसिंग धोनीकडून अशा चुका वारंवार घडतील अशी तुमची अपेक्षा नाही, पण उजव्या हाताचा फलंदाज समोर असताना तुम्ही ऑफ स्पिनरचा वापर करून जोखीम पत्करू शकता, असं म्हणत त्याने (Virender Sehwag On MS Dhoni) आश्चर्य व्यक्त केलंय.


वेगवान गोलंदाज सामान्यतः खेळाच्या नंतरच्या टप्प्यात वापरला जातो. धोनीने नवीन चेंडू तुषार देशपांडेला दिल्यावर मला आश्चर्य वाटलं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो अनेकदा खेळाच्या नंतरच्या टप्प्यात गोलंदाजी करतो. मला वाटलं कदाचित ते राजवर्धन हंगरगेकरांना नवीन चेंडू देऊ शकले असते, असं सेहवाग (Virender Sehwag On MS Dhoni) म्हणाला आहे.


आणखी वाचा - Stephen Fleming On MS Dhoni: धोनी IPL मध्ये खेळणार नाही? हेड कोचने दिली सर्वात मोठी अपडेट!


दरम्यान, सामन्यात धोनीने मोईन अली आणि शिवम दुबे यांना गोलंदाजी दिली नाही, त्यामुळे देखील त्याच्यावर टीका होताना दिसत आहे. धोनीच्या चेन्नईचा आगामी सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 3 एप्रिलला (CSK vs LSG) होणार आहे. हा सामना घरच्या मैदानावर खेळणार असल्याने धोनी अँड कंपनीकडून मोठ्या विजयाची अपेक्षा चेन्नईचे फॅन्स करत आहेत.