IPL 2023: चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे (Mahendra Singh Dhoni) ट्विटरवर 8.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. मात्र महेंद्रसिंग धोनी ट्विटर (Twitter) असो किंवा सोशल मीडियावरील (Social Media) इतर प्लॅटफॉर्म असो, तो फार फार सक्रीय नसतो. धोनीने 2021 मध्ये स्ट्रॉबेरी शेतीसंबंधी शेवटचं ट्वीट केलं होतं. मात्र शनिवारी रवींद्र जाडेजामुळे (Ravindra Jadeja) धोनीने 10 वर्षांपूर्वी केलेल्या एका ट्विटची जोरदार चर्चा रंगली. शनिवारी मुंबई इंडियन्सविरोधात (Mumbai Indians) वानखेडे (Wankhede) मैदानात झालेल्या सामन्यात रवींद्र जाडेजाने एका हातात जबरदस्त कॅच घेतल्यानंतर धोनीचं हे ट्वीट व्हायरल झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यातील नवव्या ओव्हरला रवींद्र जाडेजाने गोलंदाजी करत एक जबरदस्त कॅच घेतला. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज कॅमरॉन ग्रीनने वेगात लगावलेला फटक्यानंतर चेंडू थेट जाडेजाच्या हातात गेला. चेंडू प्रचंड वेगात असल्याने रवींद्र जाडेजा स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. अम्पायर क्रिसही चेंडू लागू नये यासाठी खाली वाकले होते. पण जाडेजा स्वत:ला वाचवत असताना डोळे बंद करुन खाली मैदानावर बसत असतानाच एका हातात चेंडू स्थिरावर आणि ग्रीन झेलबाद झाला. 


जाडेजाने कॅच घेतल्याचं पाहून ग्रीनचाही विश्वास बसत नव्हता. दरम्यान जाडेजाने हा कॅच घेतल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर धोनीचं 10 वर्षं जुनं ट्वीट व्हायरल होऊ लागलं. धोनीने एप्रिल 2013 मध्ये हे ट्विट केलं होतं. यामध्ये त्याने लिहिलं होतं की "सर जाडेजा कॅच घेण्यासाठी धावत नाही, पण बॉल त्याला शोधतो आणि त्याच्या हातात जाऊन पडतो".



मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करत चेन्नईसमोर 158 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबई इंडियन्सला चांगली सुरुवात मिळाल्यानंतर नंत मात्र फलंदाजी ढेपाळली. जाडेजाने ग्रीनला झेलबाद केल्यानंतर त्यांची स्थिती 76 वर 4 गडी बाद अशी होती. 



दरम्यान दीपक चहर दुखापतीमुळे बाहेर गेल्याने चेन्नईला चिंता सतावत होती. पण चेन्नईच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली मुंबईला रोखलं. तुषार देशपांडेने संघाला पहिलं यश मिळवून दिल्यानंतर नंतर मुंबई इडियन्सचे फलंदाज फार चांगली कामगिरी करु शकले नाहीत. 


चेन्नईने 7 गडी राखत मुंबईचा पराभव केला. या विजयासह चेन्नईने यंदाच्या सिझनमध्ये दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. चेन्नईकडून अजिंक्य रहाणेने तुफान फलंदाजी केल्याने 18 व्या ओव्हरलाच त्यांनी सामना जिंकला. या हंगामातील पहिलाच सामना खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेने 27 चेंडूत 61 धावा ठोकल्या. रहाणेने एकूण सात चौकार आणि सहा षटकार लगावले. रहाणेने फक्त 19 चेंडूत अर्धशतक ठोकलं. या हंगामातील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं.