IPL 2023: आयपीएलमध्ये शनिवारी चाहत्यांना आणखी एका रंगतदार सामन्याचा अनुभव घेता आला. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध पंजाबमध्ये (Punjab Kings) झालेल्या सामन्यात अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) खरा हिरो ठरला. अर्शदीपने शेवटच्या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी करत अक्षरश: मुंबई इंडियन्सच्या तोंडचा घास हिरावून घेतला. पंजाबने 214 धावांचा डोंगर उभा केलेला असताना मुंबईने चांगली झुंज दिली होती. पण अर्शदीपने केलेल्या जबरदस्त गोलंदाजीमुळे 13 धावांनी त्यांचा पराभव झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वानखेडे मैदानात झालेल्या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करत 8 गडी गमावत 214 धावा केल्या होत्या. मुंबईनेही पंजाबला चांगली झुंज दिली. शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबईला 16 धावांची गरज होती. यावेळी टीम डेव्हिड आणि तिलक वर्मा मैदानात होते. मात्र ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर अर्शदीपने तिलक वर्माला बोल्ड केलं. या चेंडूवर मधल्या स्टम्पचे अक्षरश: दोन तुकडे केले. इतकंचन नाही तर दुसऱ्या चेंडूवरही त्याने नेहर वढेराला बोल्ड करत पुन्हा अशीच कामगिरी केली. 



अर्शदीपच्या कामगिरीनंतर सोशल मीडियावर त्याची तुफान चर्चा रंगली आहे. दरम्यान पंजाबनेही यावरुन फिरकी घेत मुंबई पोलिसांना टॅग करत एक ट्विट केलं. यामध्ये त्यांनी मुंबई पोलिसांना आम्हाला एका गुन्ह्याची नोंद करायची आहे असं लिहिलं होतं. दरम्यान मुंबई पोलिसांनीही त्यांना भन्नाट उत्तर दिलं आहे. 


"कायदा तोडला तर कारवाई केली जाईल, स्टम्प तोडल्यावर नाही," असं उत्तर मुंबई पोलिसांनी पंजाबला दिलं असून सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे. 



दरम्यान मुंबई पोलिसांच्या बनावट अकाऊंटवरुनही पंजाबला उत्तर देण्यात आलं असून तेदेखील व्हायरल झालं आहे. "ज्याप्रमाणे भारतीय नागरिकांना आधार लिंक करणं अनिवार्य आहे, त्याप्रमाणे आयपीएल संघाला एफआयआर दाखल करण्यासाठी ट्रॉफी अनिवार्य आहे," असं उत्तर त्यावरुन देण्यात आलं आहे. अनेकांना हे बनावट खातं असल्याचं लक्षात आलं नसल्याने त्यांचा मुंबई पोलिसांनीच हे उत्तर दिल्याचा गैरसमज झाला आहे. पण हे उत्तरही अनेकांना आवडलं असून याचेही स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत. 



फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाबची सुरुवात चांगली झाली नव्हती. शॉर्ट 11 तर प्रभसिमरन सिंग 26 धावांवर तंबूत परतले होते. त्यानंतर अर्जुनच्या यॉर्करवर अथर्व 29 रन्स करून बाद झाला. यानंतर कर्णधार सॅम करनने डाव सावरला. सॅमने 29 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 55 धावा केल्या. मुंबईकडून ग्रीन (43 चेंडूत 67) आणि सूर्यकुमार यादवने (26 चेंडूत 57) चांगली खेळी केली. दोघांनी 36 चेंडूत 75 धावा ठोकल्या. 


मुंबईच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये धावा दिल्याने धावांचा डोंगर उभा राहिला. 15 ते 18 ओव्हरदरम्यान गोलंदाजांनी एकूण 82 धावा दिल्याने मुंबई इंडियन्स संघ विजयापासून लांब राहिला.