IPL 2023 play-offs scenarios: Delhi बाहेर, CSK उंबरठ्यावर; RCB, SRH साठी करो या मरो; जाणून घ्या प्ले ऑफचं गणित
IPL 2023 play-offs scenarios: आयपीएलचा (IPL) हंगाम आता आपल्या शेवटच्या टप्प्यात पोहोचत आहे. कोणते चार संघ क्वार्टर फायनलसाठी (IPL Quarter Final) पात्र ठरणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Superkings) जर आज कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) पराभव केला तर क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरेल.
IPL 2023 play-offs scenarios: आयपीएलचा (IPL) 16 वा हंगाम आता आपल्या शेवटच्या टप्प्यात पोहोचत आहे. आयपीएलच्या क्वार्टर फायनलसाठी (IPL Quarter Final) कोणते चार संघ पात्र ठरणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. त्यातच आज रविवार असल्याने दोन सामने होणार असून यामधील एका सामन्यात संघाचं भवितव्य ठरणार आहे. चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Superkings) जर आज कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) पराभव केला तर क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरेल. दरम्यान, सध्या आयपीएलच्या पॉइंट टेबलनुसार सध्या काय स्थिती आहे हे जाणून घ्या.
दिल्ली स्पर्धेतून बाहेर
पंजाब किंग्सने शनिवारी 31 धावांनी पराभव केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघ स्पर्धेबाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादचाही पराभव झाला असून गुणतालिकेत त्यांनी दिल्लीची बरोबरी केली आहे. दिल्ली आणि हैदराबाद यांचे गुण सारखेच आहेत. मात्र अद्यापही हैदराबादकडे पहिल्या चार संघात येण्याची संधी आहे. यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे.
हैदराबादला अद्यापही संधी
याचं कारण म्हणजे हैदराबादने दिल्लीपेक्षा एक सामना कमी खेळला आहे. त्यांना अजून तीन सामने खेळायचे आहेत. जर त्यांनी तिन्ही सामने जिंकले तर त्यांची गुणसंख्या 14 होईल, जी सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानी असणाऱ्या लखनऊ सुपरजायंट्सपेक्षा जास्त असेल. लखनऊकडे सध्या 13 गुण आहेत. याशिवाय त्यांना इतर सामन्यांचे निकालही त्यांच्या फायद्याचे ठरतील असे लागण्याची शक्यता आहे. पण हे सध्या तरी असंभव्य दिसत आहे.
पंजाबला हवी नशिबाची साथ
दुसरीकडे शनिवारी सामना जिंकणारे लखनऊ आणि पंजाबने आपल्या संधीत वाढ केल्याचं दिसत आहे. पंजाबकडे सध्या 12 गुण असून चौथ्या स्थानावर असणाऱ्या लखनऊपेक्षा फक्त 1 गुण कमी आहे. दुसरीकडे गुणतालिकेत त्यांनी राजस्थान रॉयल्सची बरोबरी केली आहे. पण त्यांचा रन रेट हा पंजाबपेक्षा खूपच जास्त असून आवाक्याबाहेर आहे.
चेन्नई पात्रतेच्या उंबरठ्यावर, कोलकाता जवळपास बाद
चेन्नई आणि कोलकाता संघ शनिवारी भिडणार आहेत. जर चेन्नईने आजचा सामना जिंकला तर त्यांचे गुण 15 वरुन 17 वर पोहोचतील. यामुळे पाचव्या स्थानावर असणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाला चेन्नई मागे पाडणं कठीण होणार आहे. याचा अर्थ चेन्नई प्लेऑफसाठी पात्र होणारा पहिला संघ ठरु शकतो. तर दुसरीकडे पराभव होणं कोलकाताला परवडणारं नाही. पराभवासह ते स्पर्धेतून बाहेर पडणार आहेत. त्यांच्याकडे सध्या 10 गुण असून यासह फक्त दोनच सामने शिल्लक आहेत.
याशिवाय आजचा दुसरा सामना राजस्थान आणि बंगळुरु यांच्यात होणार आहे. जर राजस्थान जिंकली तर त्यांचे 14 गुण होतील. त्यांचा रन-रेट चांगला असल्याने या विजयासह ते पाचव्यावरुन थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतील. पण जर बंगळुरु हा सामना जिंकली तर तीन संघांमध्ये एका गुणावरुन चौथ्या स्थानासाठी संघर्ष होईल. यानंतर रन-रेटच्या आधारे पात्र संघ निवडला जाईल. ज्यामध्ये राजस्थान रॉयल्स गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असणाऱ्या गुजरातनंतर दुसऱ्या स्थानी आहे.
पण जर कोलकाताने चेन्नईचा आणि बंगळुरुने राजस्थानचा पराभव केला तर मात्र प्लेऑफसाठी सातही संघांमध्ये चांगली लढत होणार आहेत. पण जर बंगळुरु आणि कोलकाताचा पराभव झाला तर मात्र अंतिम चारमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्स, लखनऊ, राजस्थान आणि पंजाब या चारही संघाना संघर्ष करावा लागेल.