IPL 2023 PK vs DC: दिल्लीने फिरवला Playoffs चा गेम, आता कसं असेल समीकरण?
IPL 2023 Playoffs Scenario: चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायन्ट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या संघामध्ये आता प्रमुख लढत सुरू आहे. जाणून घ्या प्लेऑफचं गणित...
IPL 2023 PBKS vs DC: आयपीएल 2023 मधील सामन्याच्या लढती आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज (PBKS vs DC) यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीने पंजाबचा पराभव करत प्लेऑफचं समीकरण बिघडवलंय. त्यामुळे आता कोणता संघ प्लेऑफमध्ये (IPL 2023 Playoffs) जागा मिळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
गुजरात टायटन्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत प्लेऑफसाठी (IPL 2023 Playoffs Scenario) पात्र झाले आहे. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. तर आजच्या पराभवामुळे पंजाबचा संघ देखील बाहेर पडल्यात जमा आहे. चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायन्ट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या संघामध्ये आता प्रमुख लढत सुरू आहे.
Chennai Super Kings
आगामी सामना जिंकून चेन्नईला थेट प्लेऑफचं तिकीट मिळणार आहे. आगामी सामना जिंकता आला नाही तर मुंबई, लखनऊ, बंगळुरू या संघाचा पराभव चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहोचवू शकतो.
Lucknow Super Giants
लखनऊसाठी देखील अखेरचा सामना प्लेऑफचं तिकीट देणारा असणार आहे. 15 पाईंट्सवर असलेल्या लखनऊसाठी करो या मरो असा सामना असेल. हा सामना जिंकला नाही तर चेन्नईचा दारूण पराभव, मुंबई आणि बंगळुरूचा पराभव या सर्वांची वाट पहावी लागेल.
Mumbai Indians
मुंबई इंडियन्सला आता आगामी सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. हा सामना जिंकणं पुरेसं नाही. तर चेन्नई, लखनऊ आणि आरसीबी यांच्यापैकी कोणत्याही दोन्ही संघांचा पराभव हे मुंबईसाठी फायद्याचं ठरेल.
Royal Challengers Bangalore
रॉयल चॅलेजर्स बंगळुरूसाठी आगामी दोन सामने प्लेऑफचं तिकीट देणारे असतील. दोन्ही सामन्याचा विजय त्यांना थेट प्लेऑफमध्ये पोहचवू शकतो. तसेच जर एकच सामना जिंकता आला तर मुंबई आणि राजस्थान या दोन्ही संघाचा पराभव मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचवू शकतो.
Rajasthan Royals
राजस्थान रॉयल्ससाठी आता गणित अधिक किचकट झालंय. राजस्थानला आगामी सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. तसेच त्यांना दुवाची देखील गरज भासणार आहे. मुंबई, कोलकाता, बंगळुरू या तिन्ही टीमचा 1 पराभव राजस्थानला प्लेऑफचं तिकीट मिळवून देईल.