Kane Williamson IPL 2023: आगामी आयपीएलच्या16 व्या हंगामासाठी मिनी लिलाव (IPL Retention list) येत्या 23 डिसेंबरला कोचीमध्ये रंगणार आहे. या लिलावाआधी प्रत्येक फ्रँचायजीला रिटेन (IPL Retention) आणि रिलीज खेळाडूंची यादी 15 नोव्हेंबरपर्यंत सोपवण्यास सांगितलं होतं. त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे. फँचायसीने थेट कॅप्टनच्या हातात नारळ दिला आहे.


सनरायजर्स हैदराबादला जोर का झटका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या मिनी लिलावापूर्वी सनरायजर्स हैरदबादने (Sunrisers Hyderabad) कर्णधार आणि स्टार फलंदाज केन विल्यमसनला (Kane Williamson) रिलीज केलं आहे. सोशल मीडिया पोस्ट शेअर करत फँचायसीने ही माहिती दिली आहे. इन्टाग्रामवर सनरायजर्स हैदराबादने केन विल्यमसनचा फोटो केला आणि त्याला थँक्यू (Thank You) म्हणत संघातून वगळलं आहे.


आणखी वाचा - Kieron Pollard retired : मुंबई इंडियन्सने करारमुक्त केल्यानंतर पोलार्डचा मोठा निर्णय; भावूक होत म्हणाला,...


केन विल्यमसन हा सनरायजर्स हैदराबाद (SRH) संघाचा नेतृत्व करत होता. त्यामुळे आता हैदराबादच्या कॅप्टनसीची (SRH Captain) जबाबदारी कोणाच्या खांद्यावर येणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. एक दोन नव्हे तर तब्बल 8 वर्ष विल्यमसन हैदराबाद संघासोबत होता. आयपीएल 2022 (IPL 2022) च्या लिलावात हैदराबादने केनसाठी 14 कोटी खर्च केले होते. त्याची किंमत जास्त असल्याने त्याला संघात स्थान मिळालं नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे.


पाहा पोस्ट - 



दरम्यान, केन विल्यमसनने हैदराबादसाठी 76 सामने खेळले आहेत. तर 36.22 च्या सरासरीने आणि 126.03 च्या स्ट्राईक रेटने 2 हजार 101 धावा केल्या आहेत. मात्र, त्याला कधीही संघासाठी ट्रॉफी (IPL Trophy) जिंकवता आली नाही. वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2022) देखील सेमीफायनलमध्ये केनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडला पराभव स्विकारावा लागला होता.