Kieron Pollard retired : मुंबई इंडियन्सने करारमुक्त केल्यानंतर पोलार्डचा मोठा निर्णय; भावूक होत म्हणाला,...

आयपीएल 2023 साठी मुंबई इंडियन्सने किरॉन पोलार्डला सोडण्याचा निर्णय घेतला आहे

Updated: Nov 15, 2022, 02:56 PM IST
Kieron Pollard retired : मुंबई इंडियन्सने करारमुक्त केल्यानंतर पोलार्डचा मोठा निर्णय; भावूक होत म्हणाला,... title=

Kieron Pollard retires : वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने (Kieron Pollard) आयपीएलमधून (IPL) निवृत्ती घेतली आहे. या मोसमाच्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पोलार्डसोबतचा करार संपवला होता.  12 वर्षे मुंबईकडून खेळल्यानंतर पोलार्डला मुंबईने इंडियन्सने रिलीज केले आहे. त्यानंतर आता त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. पोलार्डने निवृत्तीनंतर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. मला आणखी काही वर्षे खेळायचे होते परंतु मुंबईच्या संघाशी बोलल्यानंतर मी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे, असे पोलार्डने म्हटले आहे.

"मला आणखी काही वर्षे खेळायचे असल्याने हा निर्णय घेणे सोपे नव्हते, पण मुंबई इंडियन्सशी चर्चा केल्यानंतर मी माझ्या आयपीएल कारकिर्दीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. मला माहिती आहे की या फ्रँचायझीला बदलाची गरज आहे. जर मी आता मुंबई इंडियन्सकडून खेळलो नाही तर मी स्वतःला त्यांच्याविरुद्ध खेळताना पाहू शकत नाही. Once an MI always an MI,"असे पोलार्डने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मुंबई इंडियन्सने सोपवली जबाबदारी

पोलार्ड मुंबई इंडियन्सचा भाग नसला तरी संघ मालकांनी त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. किरॉन पोलार्डची मुंबई इंडियन्सने फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. आयपीएल 2023 पासून तो ही जबाबदारी सांभाळणार आहे. एवढेच नाही तर तो एमआय एमिरेट्सकडून खेळतानाही दिसणार आहे.

दरम्यान, पोलार्डने मुंबईकडून खेळताना 171  सामन्यांमध्ये 3412 धावा केल्या. पोलार्डचा आयपीएलमध्ये फलंदाजीचा स्ट्राईक रेट 28.67 होता. तर संपूर्ण आयपीएलच्या कारकिर्दीत स्टाईक रेट हा 147.32 होता. 16 अर्धशतके लगावणाऱ्या पोलार्डला आयपीएलमध्ये बेस्ट फिनीशर म्हणून ओळखलं जायचं. तब्बल 12 वर्षे पोलार्डने मुंबईच्या संघाची साथ दिली. एक दशकाहून अधिक काळ मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सातत्याने नाव असलेल्या पोलार्डने गेल्या मोसमात निराशाजनक कामगिरी केली. गेल्या मोसमात त्याने 11 सामन्यांत 14.40 च्यासरासरीने केवळ 144 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही केवळ 107.46 होता.