TATA IPL Schedule 2023: आलं रे...आयपीएलचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या Mumbai Indians चं पूर्ण शेड्यूल!
IPL Schedule 2023: आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर झालंय. 31 मार्च ते 28 मे या दरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. जाणून घ्या Mumbai Indians चं वेळापत्रक!
IPL 2023 Mumbai Indians : सर्वांच ज्याची प्रतिक्षा लागली होती. तो क्षण आता आता आला आहे. भारतीत प्रसिद्ध अशा इंडियन प्रिमियर लीग (Indian Premier League) म्हणजे आयपीएलच्या (IPL 2023) आगामी हंगामासाठीचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. येत्या 31 मार्चपासून हे सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना (IPL 2023, 1st Match) हा नरेंद्र मोदी स्टेडियमवर 31 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) यांच्यात खेळवला जाईल. तर मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पहिला सामना 2 एप्रिलला होणार आहे.
मुंबईचं वेळापत्रक: (Mumbai Indians schedule)
मुंबई इंडियन्सच्या 14 सामन्याचं वेळापत्रक समोर आलंय. मुंबई इंडियन्स घरच्या वानखेडे मैदानावर सात सामने खेळणार आहे, तर इतर 7 सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळणार आहे. त्यामुळे आता क्रिकेटच्या मैदानावर जोरदार कल्ला पहायला मिळेल. आयपीएल संघांमध्ये दोन ग्रुप करण्यात आलेत. पहिल्या ग्रुपमध्ये मुंबई इंडियन्सला स्थान देण्यात आलंय. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 असा पाच वेळा आयपीएल कप घरी नेणारा संघ, यंदा बाजी मारणार का?
मुंबई इंडियन्सचं पूर्ण शेड्यूल (Full schedule of Mumbai Indians)
2 एप्रिल - मुंबई इंडियन्स vs रॉयल चैलेंजर्स बैंगलोर
8 एप्रिल- मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स
11 एप्रिल- मुंबई इंडियन्स vs दिल्ली कैपिटल्स
16 एप्रिल- मुंबई इंडियन्स vs कोलकाता नाइट राइडर्स
18 एप्रिल- मुंबई इंडियन्स vs सनराइजर्स हैदराबाद
22 एप्रिल- मुंबई इंडियन्स vs पंजाब किंग्स
25 एप्रिल- मुंबई इंडियन्स vs गुजरात टाइटन्स
30 एप्रिल- मुंबई इंडियन्स vs राजस्थान रॉयल्स
3 मे - मुंबई इंडियन्स vs पंजाब किंग्स
6 मे - मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स
9 मे - मुंबई इंडियन्स vs रॉयल चैलेंजर्स बैंगलोर
12 मे - मुंबई इंडियन्स vs गुजरात टाइटन्स
16 मे - मुंबई इंडियन्स vs लखनऊ सुपर जायन्ट्स
21 मे - मुंबई इंडियन्स vs सनराइजर्स हैदराबाद
मुंबई इंडियन्सचा संघ (Mumbai Indians Squad)-
रोहित शर्मा (C), डेवॉल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, अर्जुन तेंडुलकर, ऋतिक शोकिन, जोफ्रा आर्चर, मोहम्मद अरशद खान, तिलक वर्मा, रमनदीप सिंह, टिम डेव्हिड, जसप्रीत बुमराह, कॅमरून ग्रीन, जाये रिचर्ड्सन, कुमार कार्तिकेय, ट्रिस्टन स्टब्स, पीयुष चावला, आकाश मधवाल, शम्स मुलानी, जेसन बेहरनडॉर्फ, नेहल वधेरा, विष्णू विनोद, राघव गोयल.