Indian Premier League-2023 :  2023 च्या आयपीएलची (IPL 2023) आतापासून चर्चा सुरु झाली आहे. कारण जगभरातील खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात, विशेष म्हणजे त्यांची कामगिरी सुद्धा चांगली राहिलेली आहे. जगभरातील क्रिकेटचे चाहते (Cricket Fan) आयपीएलचा आनंद घेतात. कोणते खेळाडू टीममध्ये राहणार आणि कोणते खेळाडू बाहेर पडणार याची अंतिम तारिख आहे. त्यामुळे कोणता खेळाडू कोणत्या टीममधून (Team) खेळणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. असे असताना आयपीएलच्या पुढील हंगामाशी संबंधित एक बातमी चाहत्यांना निराश करू शकते. लीगच्या 16व्या हंगामाची सुरुवात होण्यास उशीर होऊ शकतो. याचे कारण दुसरे तिसरे कोणी नसून भारताने आयोजित केली जाणारी दुसरी स्पर्धा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरी आयपीएल उशीराचं कारण!


इंडियन प्रीमियर लीगचा (IPL-2023) 16वा हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. लीगचा 16वा हंगाम आता मार्चमध्ये पारंपारिक प्रारंभाऐवजी 7-8 दिवसांच्या विलंबानंतर सुरू होऊ शकतो. याचे कारण म्हणजे बीसीसीआयने पहिल्यांदाच महिला आयपीएलचे आयोजन केले आहे. इनसाइड स्पोर्टने बीसीसीआय मुख्यालयातील सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.


23 डिसेंबर रोजी लिलाव


महिला आयपीएलचा उद्घाटन हंगाम 3 मार्चपासून सुरू होणार आहे. त्याचा अंतिम सामना 26 मार्च रोजी होणार आहे. यामुळेच पुरुषांच्या आयपीएलचा पुढचा हंगाम 7 ते 8 दिवसांच्या विलंबाने सुरू होईल. याआधी 23 डिसेंबरला IPL-2023 साठी लिलाव होणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही स्पर्धा भारतात खेळल्या जाणार आहेत.


वाचा : बांगलादेश दौऱ्यातून भारतीय संघाला काय मिळाले? तुम्हाला काय वाटत?  


महिला T20 विश्वचषकानंतर आय.पी.एल


महिला T20 विश्वचषक फायनलच्या एका आठवड्यानंतर महिला आयपीएल सुरू होणार आहे. महिला T20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना 26 फेब्रुवारी रोजी केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने अद्याप तारखा जाहीर केल्या नसल्या तरीही बीसीसीआय महिला आयपीएलचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. इतकेच नाही तर बीसीसीआय शहरावर आधारित संघांऐवजी झोन ​​आधारित संघ शोधत आहे. प्रत्येक संघ एका विशिष्ट प्रदेशाचे प्रतिनिधित्व करेल.