India vs Bangladesh Series: बांगलादेश दौऱ्यात Team India ला दुखापतीचं ग्रहण, टीम इंडियाला विजयासाठी करावी लागणार तगडी मेहनत

IND VS BAN, 3rd ODI:  भारताने बांगलादेशचा केला 227 धावांनी पराभव केला असला तरी बांगलादेश संघाने त्यांच्याच घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा 2-1 असा पराभव केला आहे. आता टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी मालिका खेळायच्या आहेत. दरम्यान, चाहत्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच असेल की बांगलादेश दौऱ्यातून भारतीय संघाला काय मिळाले?

Updated: Dec 11, 2022, 08:49 AM IST
India vs Bangladesh Series: बांगलादेश दौऱ्यात Team India ला दुखापतीचं ग्रहण, टीम इंडियाला विजयासाठी करावी लागणार तगडी मेहनत title=
ind vs ban odi series analysis ishan kishan double century

Ind vs Ban 3rd ODI highlights : भारताने बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात 227 धावांनी पराभव करत आपली लाज वाचवली असली तरी बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं (Team India) अतिशय निराशाजनक कामगिरी केली. भारताचा सलामीवीर इशान किशनच्या (Ishan Kishan) धडाकेबाज 210 आणि विराट कोहलीच्या 113 धावांच्या जोरावर भारताने 409 धावा केल्या. विजयासाठी 410 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा डाव 182 धावात गुंडाळला. 

तर दुसरीकडे टीम इंडियाने (team India) पहिली तीन एकदिवसीय मालिका खेळली. ज्यामध्ये त्यांना 2-1 ने पराभवाचा सामना करावा लागला. आता बांगलादेशविरुद्ध (IND VS BAN, 3rd ODI) दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका फक्त वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जाईल. मात्र, भारतीय संघाने चांगली कामगिरी करत वनडे मालिका संपुष्टात आणली आहे. शनिवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इशान किशनने सर्वात जलद द्विशतक करण्याचा विक्रम केला आहे. पण चाहत्यांना अजूनही एकच प्रश्न पडतो की बांगलादेश दौऱ्यातून भारतीय संघाला काय मिळाले? या दौऱ्यातून काय मिळाले ते जाणून घेऊया...

सलग दुसऱ्या मालिकेत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

बांगलादेशविरुद्धच्या वनडे द्विपक्षीय मालिकेतील भारतीय संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. याआधी महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली बांगलादेशने वनडे मालिका 2-1 ने गमावली होती. मात्र यावेळी त्यांना अत्यंत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान पहिल्या दोन सामन्यांमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत अत्यंत खराब कामगिरी केली.

वाचा : आज लोकलने प्रवास करणार असाल तर ही बातमी वाचा!
 
तसेच डेथ ओव्हर्स आणि मधल्या ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाजांचा पर्दाफाश झाला आहे. कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) अव्वल फलंदाजी क्रमवारीत शिखर धवनची अवस्थाही वाईट झाली आहे. धवन विश्वचषक खेळण्याचा दावेदार मानला जात आहे. परंतु अशा कामगिरीमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. क्षेत्ररक्षणातही केएल राहुलने शेवटच्या क्षणी झेल सोडला. वॉशिंग्टन सुंदर आणि इतर क्षेत्ररक्षकांच्या प्रयत्नांवरही प्रश्नचिन्ह आहे.

या दौऱ्यात भारतीय खेळाडूंना दुखापत 

या बांगलादेश दौऱ्यात भारतीय खेळाडूंनाही अनेक दुखापती झाल्या आहेत. एकदिवसीय मालिका संपेपर्यंत 5 खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत. यामध्ये कर्णधार रोहित शर्माचाही समावेश असून खेळाडूंच्या दुखापतीमुळे आता कसोटी मालिकाही धोक्यात आली आहे.

दरम्यान या दौऱ्यापूर्वीच ऋषभ पंतला (Rishabh Pant) दुखापत झाली आणि तो मालिकेतून बाहेर पडला. मात्र त्याच्या दुखापतीची अद्याप पुष्टी झाली नाही. पण अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलाही दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. त्यानंतर दुसऱ्या वनडेत कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली. वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि कुलदीप सेन यांनाही दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. सर्वजण भारतात परतले आहेत.

इशान म्हणून उत्कृष्ट ओपनिंग पर्याय

एकदिवसीय मालिका संपल्यामुळे भारतीय संघासाठी एक गोष्ट निश्चितच चांगली झाली आहे. त्याला ईशान किशनच्या रूपाने सर्वोत्तम सलामीचा पर्याय मिळाला आहे. इशानने तिसऱ्या वनडेत 131 चेंडूत 210 धावा केल्या. ज्यामध्ये 24 चौकार, 10 षटकारांचा समावेश होता. त्याने सर्वात जलद 126 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. जो एक विश्वविक्रम आहे. पुढील विश्वचषकासाठी इशानच्या रूपाने चांगला पर्याय सापडला आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा इशान चौथा भारतीय ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनीही ही कामगिरी केली आहे. रोहितने कारकिर्दीत तीन वेळा द्विशतक झळकावले आहे. सर्वाधिक 264 धावाही रोहितच्या नावावर आहेत.