IPL 2023: Shreyas Iyer ने सोडली KKR ची कॅप्टन्सी? आता `या` खेळाडूकडे सोपवणार जबाबदारी!
IPL 2023, Shreyas Iyer: आयपीएलपूर्वी चाहत्यांसाठी वाईट बातमी समोर आली आहे. श्रेयस अय्यरने केकेआरचं (KKR) कर्णधारपद सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नवा कॅप्टन कोण? यासाठी तीन नवी नावं समोर आली आहेत.
Shreyas Iyer, KKR: जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत अशा इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) 31 मार्चपासून सुरू होत आहे. आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असल्याचं पहायला मिळतंय. यपीएलच्या यंदाच्या (IPL 2023) हंगामाला 31 मार्चपासून सुरू होणार आहे. पहिला सामना महेंद्रसिंह धोनी आणि हार्दिक पांड्या यांच्या संघात (CSK vs GT) खेळवला जाणार आहे. आयपीएलची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच आता शाहरूख खानच्या कोलकाता नाईट रायडर्ससाठी (KKR) वाईट बातमी समोर आली आहे.
अय्यर आयपीएल खेळणार नाही?
केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आयपीएलच्या (IPL 2023) पहिल्या सत्रात खेळू शकणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. श्रेयस अय्यर जखमी झाल्याने तो आयपीएलचे काही सामने खेळू शकणार नाही. आयपीएलच्या अखेरच्या सामन्यात श्रेयस संघात येऊन संघाला नवी उभारी मिळवून देऊ शकतो. त्यामुळे आता केकेआरचा नवा कॅप्टन कोण? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या 5 व्या दिवसापूर्वी अय्यर फीट नसल्याचं समोर आलं होतं. अय्यरने पाठीच्या दुखापतीची तक्रार केली होती. कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) कर्णधार म्हणून तो सध्या जबाबदारी सांभाळत होता. त्यानंतर आता त्याच्या जागी दोन खेळाडूंची नावं समोर आली आहे.
KKR चा नवा कॅप्टन कोण?
कोलकाताच्या संघात तीन खेळाडू खूप अनुभवी आहेत, ज्यांना कॅप्टन्सीचा अनुभव आहे. ज्यामध्ये एक न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदी आणि दुसरा आंद्रे रसेल आहे. तर वर्ल्ड क्लास ऑलराऊंडर शाकिब अल हसनला देखील कॅप्टन केलं जाऊ शकतं. त्यामुळे आता अय्यरच्या अनुपस्थितीत कोणाच्या खांद्यावर जबाबदारी येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Kolkata Knight Riders चा संघ -
श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रहमानउल्ला गुरबाज, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शार्दुल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, रिंकू सिंग, नारायण जगवोरे, नारायण जगदीश. , सुयश शर्मा, डेव्हिड वाईज, कुलवंत खेजरोलिया, मनदीप सिंग, लिटन दास, साकिब अल हसन
कोलकाता नाइट राइडर्सचं संपूर्ण शेड्यूल: (Full schedule of KKR)
1 एप्रिल कोलकाता नाइट राइडर्स vs पंजाब किंग्स
6 एप्रिल कोलकाता नाइट राइडर्स vs रॉयल चैलेंजर्स बैंगलोर
9 एप्रिल कोलकाता नाइट राइडर्स vs गुजरात टाइटन्स
14 एप्रिल कोलकाता नाइट राइडर्स vs सनराइजर्स हैदराबाद
16 एप्रिल कोलकाता नाइट राइडर्स vs मुंबई इंडियंस
20 एप्रिल कोलकाता नाइट राइडर्स vs दिल्ली कैपिटल्स
23 एप्रिल कोलकाता नाइट राइडर्स vs चेन्नई सुपर किंग्स
26 एप्रिल कोलकाता नाइट राइडर्स vs रॉयल चैलेंजर्स बैंगलोर
29 एप्रिल कोलकाता नाइट राइडर्स vs गुजरात टाइटन्स
4 मे कोलकाता नाइट राइडर्स vs सनराइजर्स हैदराबाद
8 मे कोलकाता नाइट राइडर्स vs पंजाब किंग्स
11 मे कोलकाता नाइट राइडर्स vs राजस्थान रॉयल्स
14 मे कोलकाता नाइट राइडर्स vs चेन्नई सुपर किंग्स
20 मे कोलकाता नाइट राइडर्स vs लखनऊ सुपर जायन्ट्स