IPL Team Captain Changed: आयपीएलचं  (IPL 2023) काऊंटडाऊन सुरु झालं आहे. सर्व दहा संघ सज्ज झालेत आणि चाहते आतुरतेने स्पर्धा सुरु होण्याची वाट पाहातायत. आयपीएलच्या सोळाव्या हंगामालात सुरुवात व्हायरला आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. कोरोनामुळे (Corona) गेली दोन वर्ष आयपीएल स्पर्धेवर बंधनं घालण्यात आली होती. पण यावर्षी आयपीएल स्पर्धा भव्य-दिव्य होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) सलामीचा सामना रंगणार असून त्याआधी भव्य उद्घाटन सोहळा रंगणार आहे. पण स्पर्धा सुरु होण्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संघाने बदलला कर्णधार
आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने कर्णधार बदलला आहे. टीम इंडियाचा (Team India) अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारवर (Bhuvneshwar Kumar) हैदराबाद संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी हा बदल असणार आहे. हैदराबाद संघाचा कर्णधार एडेन मार्कराम (Aiden Markram) दक्षिण आफ्रिकेसाठी (South Africa) सामना खेळत आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी तो उपलब्ध नसणार. तोपर्यंत भुवनेश्वर कुमारकडे हैदराबादच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपण्यात आली आहे. सनरायजर्स हैदराबादचा पहिला सामना रविवारी राजस्थान रॉयर्सविरुद्ध घरच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. 


मार्कराम देशासाठी खेळण्यात व्यस्त
दक्षिण आफ्रिका आणि नेदेरलँडदरम्यान 2 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत क्वालीफाय होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला ही मालिकी महत्वाची आहे.  31 मार्च आणि 2 एप्रिलला हे सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेसाठी एडेन मार्कराम दक्षिण आफ्रिकेत आहे. मालिका संपल्यानंतर 3 अप्रिलला मार्कराम भारतात दाखल होईल. 


भुवनेश्वर कुमारकडे जबाबदारी
33 वर्षांचा भुवनेश्वर कुमार सुरुवातीपासून सनरायजर्स हैदराबादचा भाग आहे. त्यामुळे मार्करामच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमारवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पण भुवनेश्वरची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याने 2019 मध्ये 6 सामन्यात तर 2022 मध्ये एका सामन्यात कर्णधारद सांभाळलं होतं. त्याच्या नेतृत्वात खेळलेल्या सात सामन्यांपैकी दोन सामन्यात संघाला विजय मिळवता आला होता. 


सनराइजर्स हैदराबादचा संघ
एडेन मार्करम (कर्णधार), राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॉनसन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन, कार्तिक त्यागी, फजलहक फारूकी, अनमोलप्रीत सिंह, अकील होसेन, नीतीश कुमार रेड्डी, मयंक डागर, उपेंद्र यादव, संवीर सिंह, समर्थ व्यास, विवरांत शर्मा, मयंक मार्केंडे, आदिल राशिद, हेनरिक क्लासेन, मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक