Ambati Raydu on Virat Kohali: आयपीएल 2024 च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. आयपीएल फायनलच्या इतिहासात केकेआरने सर्वात मोठा विजय मिळवलाय. तब्बल 10 वर्षानंतर केकेआरने आयपीएलची ट्रॉफी उचलली अन् तिसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलंय. यंदाच्या आयपीएल हंगामात आरसीबीचा स्टार विराट कोहली ऑरेंज  कॅपचा मानकरी ठरला. श्रेयस अय्यरने विराटच्या वतीने कॅप स्विकारली. अशातच आता विराटला ऑरेंज कॅप मिळताच चेन्नईचा स्टार खेळाडू अंबाती रायडू याने पुन्हा एकदा विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला Ambati Rayudu ?


सुनील नारायण, आँद्रे रसेल आणि स्टार्कसारख्या दिग्गजांच्या पाठीशी उभं राहिल्याबद्दल केकेआर संघाचं कौतूक करायला हवं. या तिन्ही खेळाडूंनी महत्त्वाच्या सामन्यात विजय मिळवून देण्यात महत्त्वाचं योगदान दिलंय. अशा प्रकारे एखाद्या संघाला आयपीएल जिंकता येते. आपल्याला याचा प्रत्यय अनेकदा पहायला मिळतो. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप मिळवल्याने तुम्हाला चॅम्पियन बनता येत नाही. त्यासाठी प्रत्येक खेळाडूला योगदान द्यावा लागतं, असं अंबाती रायडू म्हणाला आहे.


अंबाती रायडूने यावेळी विराट कोहलीला सल्ला देखील दिलाय. विराट कोहलीने आपला दर्जा कमी करावा, जेणेकरून इतर फलंदाजांना त्याच्याशी बरोबरी करण्याची संधी मिळेल आणि दबाव वाटेल. विराटने आपली पातळी खाली ठेवली तर युवा खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये प्रेशर राहणार नाही, असंही अंबाती रायडू (Ambati Rayudu) याने म्हटलं आहे.



दरम्यान, काही दिवसांपूर्वी देखील अंबाती रायडूने विराट कोहलीला निशाण्यावर घेतलं होतं. मला खूप वाईट वाटतं, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे फॅन्स कित्येक वर्षांपासून आपल्या संघाला सपोर्ट करतायेत. जर आरसीबीच्या मॅनेजमेंट आणि संघाच्या लीडर्सने आपले वैयक्तिक रेकॉर्ड्स बाजूला ठेवले असते, तर या संघाने आतापर्यंत कितीतरी ट्रॉफी जिंकल्य असत्या. कितीतरी चांगले खेळाडूंना या फ्रँचायझीने जाऊ दिले. संघाच्या मॅनेजमेंटवर दबाव टाकला गेला असता तर संघाने खुप चांगली केली असती, असं म्हणत अंबाती रायडूने विराटचं नाव न घेता टीका केली होती.