IPL 2024 च्या लिलावानंतर Viral झाली RCB ची Playing XI; यादी पाहिल्यावर गोंधळून जाल
IPL 2024 Auction RCB Playing 11: आयपीएल 2024 साठीचा लिलाव दुबईमध्ये पार पडला. या लिलावामध्ये सहभागी झालेल्या 10 संघांपैकी विराट कोहलीचा आरसीबी संघ फारच ट्रोल होत आहे.
IPL 2024 Auction RCB Playing 11: इंडियन प्रीमिअर लीगच्या 2024 च्या पर्वासाठीचा लिलाव 19 डिसेंबर रोजी पार पडला. दुबईमध्ये पार पडलेल्या या लिलावामध्ये अनेक खेळाडूंना अनपेक्षितरित्या मोठी रक्कम बोलीमध्ये मिळाली. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले. ऑस्ट्रेलियन संघाला एकदिवसीय क्रिकेटमधील वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या संघाचा भाग असलेल्या मिचेल स्टार्कसाठी कोलकाता नाइट रायडर्सने तब्बल 24 कोटी 75 लाख रुपये मोजले. आयपीएलच्या इतिहासामधील ही सर्वात मोठी बोली ठरली. दुसरीकडे सोशल मीडियावर लोक विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला ट्रोल करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर आरसीबीच्या संघाबद्दल चिंता व्यक्त करताना मजेदार पोस्ट व्हायरल केली आहे.
काय आहे व्हायरल लिस्टमध्ये?
आरसीबीच्या संघाची फलंदाजी तर फार दमदार दिसत आहे. मात्र त्या तुलनेत आरसीबीची गोलंदाजी तितकीशी प्रभावी वाटत नसल्याची चाहत्यांची तक्रार आहे. लिलावानंतर अनेकांनी एक लोकप्रिय मिम शेअर करत कोहलीच्या संघाची 'विराट' मस्करी केली आहे. आरसीबीची प्लेइंग 11 चा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर जस्ट इंडियन थिंग्स नावाच्या पेजवरही हे व्हायरल मीम शेअर केलं आहे. उपहासात्मकरित्या आरसीबीच्या प्लेइंग 11 ची खिल्ली उडवताना 11 जणांची मजेदार यादी शेअर केली आहे. सलामीवीर म्हणून कर्णधार फाफ ड्युप्लेसिस आणि विराट कोहली असतील. तिसऱ्या क्रमांकावर ग्लेन मॅक्सवेल आहे. चौथ्या क्रमांकावर रजत पाटीदार असून पाचव्या क्रमांकावर कॅमेरुन ग्रीन आहे. त्यानंतर पुढे लिहिलेली यादी पाहून तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही.
सहाव्या क्रमांकावर 'हे प्रभू', सातव्या क्रमांकावर 'हे हरी राम', आठव्या क्रमांकावर 'कृष्णा', नवव्या क्रमांकावर 'जगननाथ', दहाव्या क्रमांकावर 'प्रेमा नंद' आणि 11 व्या क्रमांकावरील खेळाडूचं नाव 'ये क्या हुआ' असं लिहिलेलं आहे. ही शेवटची काही नावं पाहून तुम्हाला समजलं असेल की ही यादी एका मिमपासून तयार करण्यात आली आहे.
आरसीबी नाही हारसीबी
इन्स्टाग्रामवर 21 हजारांहून अधिक जणांनी ही पोस्ट लाईक केली आहे. पोस्ट पाहिल्यानंतर एका युझरने, 12 वा खेळाडू गमछा खुल गया होगा नावाचा असावा असं म्हटलंय. तर अन्य एका युझरने, "ई साला कप रहने दे!" असा सल्ला आरसीबीला दिला आहे. 'कॅमेरुन ग्रीनपासूनच हे प्रभूची सुरुवात झाली पाहिजे कारण तो पूर्णपणे तंदरुस्त नाही,' अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. एकाने तर या संघाला आरसीबी न म्हणता हारसीबी म्हणावं असा टोला लगावला आहे.