आयपीएल लिलावादरम्यान मोठी बातमी! अमिताभ बच्चन यांनी विकत घेतला मुंबईचा संघ
IPL 2024 : आयपीएल 2024 साठी दुबईत मिनी ऑक्शन सुरु आहे. 333 खेळाडूंवर 263 कोटी रुपयांची बोली लावली जातेय. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईच संघ खरेदी केला आहे.
IPL 2024 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांना वेध लागले आहेत ते आयपीएलच्या सतराव्या हंगामाचे. आयपीएल 2024 साठी दुबईत मिनी ऑक्शन पार पडला. वेस्टइंडिजचा रॉवमेन पॉवेलवर 7.40 कोटींची बोली लागत या लिलावाला सुरुवात झाली. पॉवेलला राजस्थान रॉयलने आपल्या संघात घेतलं तर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या ट्रेव्हिस हेडवर सनरायझर्स हैदराबादने 6.80 कोटी रुपयांची बोली लावली. हॅरी ब्रुकला 4 कोटी रुपयात दिल्ली कॅपिटल्सने आपल्या संघात घेतलं. एकीकडे चांगले खेळाडू आपल्या संघात घेण्यासाटी चढाओढ सुरु असतानाच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबईचा संघ विकत घेतला आहे.
शाहरुख, प्रितीनंतर आता अमिताभ बच्चन
बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं तसंच जुनंच आहे. आयपीएलच्या दहा फ्रँचाईजीमध्ये काही संघ बॉलिवूड सेलिब्रेटींचे आहेत. यात शाहरुख खान-जुही ((Shah Rukh Khan-Juhi Chawla) चावला कोलकाता नाईट रायडर्सचे मालक आहेत. तर पंजाब किंग्जची मालकी प्रीति झिंटाकडे (Preity Zinta) आहे. आत या यादीत आणखी एका सेलिब्रेटीचं नाव जोडलं गेलं आहे. बीग बी अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आपला क्रिकेटचा संघ खरेदी केला आहे. त्यामुळे आता अमिताभ बच्चनही मैदानात आपल्या संघाला चिअर करताना दिसणार आहेत.
Amitabh Bachchan यांनी खरेदी केला संघ
अमिताभ बच्चन यांनी मुंबईचा संघ विकत घेत असल्याची घोषणा आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन केली आहे. इंडियन्स स्ट्रेट प्रीमिअर लीगमध्ये (ISPL) अमिताभ बच्चन यांनी मुंबईचा संघ खरेदी केला आहे. आयएसपीएल ही भारताततील पहिली टेनिस बॉल टी10 टूर्नामेंट आहे. ISPL चा पहिला हंगाम 2 मार्चे ते 9 मार्च दरम्यान मुंबईत आयोजित केला जाणार आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर यासंदर्भातला एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोसोबत अमिताभ बच्चन यांनी एक कॅप्शनही लिहिलंय, यात त्यांनी म्हटलंय ISPL म्हणजेच स्ट्रीट प्रीमिअर लीगची सुरुवात रोमांचक, साहसाने भरलेली आहे. रस्त्यावर, गल्लीत आणि घरात खेळपट्टी नसताना ज्यांनी आपल्या क्षमतेचं प्रदर्शन केलं. त्या खेळाडूंसाठी ही लीग चांगली संधी आहे. मुंबई संघाचा मालक म्हणून त्यांच्याबरोबर रहाणं आपल्यासाठी सौभाग्य असल्याचं अमिताभ बच्चन यांनी म्हटलंय.
Indian Street Premier League
आएसपीएलमध्ये एकूण सहा संघांचा सहभाग आहे. यात मुंबई, हैदराबाद, बंगळुरु, चेन्नई, कोलकाता आणि श्रीनगर संघांचा समावेश आहे. या लीगमध्ये मुंबई संघाचे मालक अमिताभ बच्चन, श्रीनगर संघाचा मालक अक्षय कुमार आणि ऋतिक रोशन बंगळुरु संघाचा मालक आहे. आयपीएलप्रमाणेच आयसपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. यात खेळाडूंची बेस प्राईज 3 लाख तर सर्वाधिक किंमत 50 लाख इतकी असणार आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लिलाव प्रक्रिया पार पडेल. या स्पर्धेसाटी कहा शहरांचे जवळपास 350 खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलं आहे.