चेन्नई आणि बंगळुरुच्या विजयाने पॉईंटटेबलमध्ये उलथापालथ, पर्पल-ऑरेंज कॅपची चुरसही वाढली
CSK vs SRH: IPL 2024 : आयपीएलच्या रविवारी झालेल्या डबल हेडरमध्ये चेन्नई सुपर किंग्सने सनरायजर्स हैदराबादचा तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सचा पराभव केला. या विजयामुळे आयपीएल पॉईंटटेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे.
IPL 2024 Points Table, Orange Cap & Purple Cap: आयपीएलमध्ये रविवारी डबल हेडर सामने खेळवण्यात आले. यात पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायन्सचा 9 विकेट राखून पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनराजर्स हैदराबादवर 78 धावांनी मात केली. बंगळुरु आणि चेन्नईच्या विजयाने पॉईंटटेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. चेन्नईने थेट तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर बंगळुरुनेही प्ले ऑफमधल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. याबरोबरच ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपची चुरसही वाढली आहे.
चेन्नईची सुपर कमाल
आयपीएल 2024 च्या सेहचाळीसव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद आमने सामने होते. चेन्नईचं होम ग्राऊंड असलेल्या एमए चिदम्बरम स्टेडिअमवर हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पहिली फलंदाजी करताना चेन्नईने हैदराबादसमोर 213 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण सनरायजर्स हैदराबादने पुन्हा एकदा आपली परंपरा कायम ठेवली. 200 पेक्षा जास्त धावांचं आव्हान पार करताना हैदराबादची दमछाक होते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. चेन्नईने हैदराबादवर 78 धावांनी मात केली.
पॉईंटटेबलमध्ये चेन्नईची मोठी झेप
या विजयाबरोबर चेन्नईने आयपीएल पॉईंटटेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. चेन्नई सहाव्या स्थानावरुन थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. यामुळे सनरायजर्स हैदराबाद तिसऱ्या क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर घसरली आहे. पॉईंटटेबलमध्ये जबरदस्त चुरस पाहायला मिळतेय. तब्बल पाच संघांच्या खात्यात 10 गुण आहेत. यात कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स सनरायजर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा समावेश आहे.
पॉईंटटेबलमध्ये चुरस
आयपीएल पॉईंटटेबलमध्ये संजू सॅमसमनच्या राजस्थान रॉयल्सने निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. राजस्थान रॉयल्सने नऊपैकी तब्बल 8 सामन्यात विजय मिळवत पहिल्या स्थानावर दावा ठोकलाय. राजस्थानच्या खात्यात 16 पॉईंट जमा आहेत. त्यामुळे राजस्थानचं प्ले ऑफमधलं स्थान जवळपास निश्चित आहे. दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स असून त्यांच्या खात्यात 10 पॉईंट जमा आहेत. केकेआरने आठपैकी पाच सामन्यात विजय मिळवलाय. यानतंर चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, लखनऊ सुपुर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. या चारही संघाने पाच सामने जिंकलेत. पण नेट रन रेटच्या आधारे त्यांचं पॉईंटटेबलमधलं स्थान आहे.
सातव्या क्रमांकावर गुजरात टायटन्स असून गुजरातने दहापैकी चार सामन्यात विजय मिळवलाय. तर आठव्या क्रमांकावर असलेल्या पंजाब किंग्लने नऊ पैकी तीन सामन्यात विजय मिळवलाय. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु नवव्या आणि दहावा क्रमांकावर आहे. मुंबईे नऊपैकी तीन तर बंगळुरुने दहापैकी तीन सामन्यात विजय मिळवलाय.
ऑरेंज कॅपची चुरस
आयपीएलमध्ये 46 व्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपची चुरसही वाढली आहे. चेन्नईचा ऋतुराज गायकवाडने थेट दुसऱ्य क्रमांकावर झेप घेतली आहे. ऋतुराजने नऊ सामन्यात 447 धावा केल्या आहेत. तर पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या विराट कोहलीने 10 सामन्यात 500 धावा केल्यात. साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर असून त्याच्या नावावर दहा सामन्यात 418 धावा आहेत.
पर्पल कॅपची चुरस
आयपीएलमध्ये पर्पल कॅपच्या शर्यतीत मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह टॉपवर आहे. बुमराहने नऊ सामन्यात 14 विकेट घेतल्यात. तर चेन्नईच्या मुस्तफिजूर रेहनान आणि पंजाबच्या हर्षल पटेलनेही 14 विकेट घेतल्यात. रेहमान दुसऱ्या तर हर्षल पटेल तिसऱ्या क्रमांकावर आहेत.